अदानींमुळे आता 'या' दिग्गज सरकारी बँका निघणार दिवाळखोरीत

दिल्ली: अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या वर्षभरात ज्या वेगाने गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली, त्याच वेगाने त्यांच्या संपत्तीत घसरण होत आहे.हिंडेनबर्गने आपल्या अहवालात गौतम अदानी यांच्यावर अकाउंटिंग फ्रॉड, शेअर्सच्या किंमतीत फेरफार केल्याचे आरोप केले. रिसर्च फर्मने म्हटले आहे की, अदानीच्या शेअर्सची किंमत 80 ते 85 टक्क्यांनी जास्त आहे.हा अहवाल आल्यापासून अदानीचे शेअर्स 85 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, हा अहवाल आल्यापासून केवळ अदानीच नव्हे तर त्यांच्या गुंतवणूकदारांचेही मोठे नुकसान होत आहे. यामुळे अदानीसह अनेकांचे नुकसान होत आहे.

एलआयसीचे सर्वात जास्त नुकसान :

अदानीच्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला दुहेरी फटका बसला आहे. LIC ची अदानी समूहाच्या 5 कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे.एलआयसीने अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पोर्ट्समध्ये गुंतवणूक केली आहे. 23 जानेवारी रोजी या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 72,193.87 कोटी रुपये होते, ते ऑगस्टमध्ये 26,861.88 कोटी रुपयांवर आले आहे.अदानीच्या समभागांच्या घसरणीनंतर एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य 62 टक्क्यांनी घसरले आहे. अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या एलआयसीच्या शेअर्समध्ये 17 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.24 जानेवारी रोजी एलआयसीच्या शेअर्सचे मूल्य 714.50 रुपये होते, जे 24 फेब्रुवारीला 590.90 रुपयांवर घसरले होते. एलआयसीचे शेअर्स एका महिन्यात 123 रुपयांनी किंवा 17 टक्क्यांनी घसरले आहेत.एसबीआयच्या शेअर्समध्ये मोठी घसरण :

गौतम अदानी यांच्या कंपनीला झालेल्या तोट्याचा परिणाम एसबीआयवरही झाला आहे. अदानींनी एसबीआयकडून सर्वाधिक कर्ज घेतले आहे. अदानीवरील कर्जाचा बोजा पाहता एसबीआयच्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.जर अदानी कर्जाची परतफेड करू शकले नाही तर बँकेचे मोठे नुकसान होईल, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे, त्यामुळे एसबीआयच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. SBI चे समभाग 14 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. SBI चा शेअर 23 जानेवारीला 604.60 रुपये होता, तो 23 फेब्रुवारीला 521 रुपयांवर घसरला आहे.

अदानीशी संबंधित 'या' बँकांनाही धक्का :

इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर 17 टक्क्यांनी घसरले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शेअर्स एका महिन्यात 16.47 टक्क्यांपर्यंत घसरले. पंजाब आणि सिंध बँकेचे शेअर्स एका महिन्यात 15.6 पर्यंत घसरले आहेत.याशिवाय बँक ऑफ बडोदाचे एका महिन्यात 2 टक्क्यांनी शेअर्स घसरले आहेत. म्हणजेच हिंडेनबर्ग अहवालामुळे केवळ अदानीच नाही तर त्याच्याशी संबंधित लोकांनाही धक्का बसला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने