देशाला मिळाली आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर फॅक्ट्री, जाणून घ्या खासियत

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच बेंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीक 2023 चे उद्घाटन केले. हा एनर्जी वीक 6 ते 8 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या एनर्जी वीकदरम्यान, पीएम मोदी यांनी कर्नाटकातील तुमाकुरू येथे HALच्या हेलिकॉप्टर कारखान्याचे आज उद्घाटन केले. ही आशिया खंडातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना आहे. येत्या 20 वर्षांत येथे 1 हजारहून अधिक हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत.हा कारखाना 615 एकरमध्ये पसरला असून येथे हेलिकॉप्टर तयार केले जाणार आहेत. दरवर्षी सुमारे 30 हेलिकॉप्टर बनवण्याची योजना आखण्यात आली आहे.शासनाने संपूर्ण नियोजनासह आखलाय प्लान

1) हेलिकॉप्टर निर्माण क्षमता वाढवण्यावर भर - आशियातील या सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर कारखान्याच्या मदतीने देशातील हेलिकॉप्टर बनवण्याची क्षमता वाढणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) बनवले जातील. हे स्वदेशी डिझाइन आणि 3-टन श्रेणीचे सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे. पहिल्या वर्षी येथे 30 हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने