जे बात...! खास होळीसाठी महिलांनी गायीच्या शेणापासून बनवलं ६ टन लाकूड

हाथरस होळीमध्ये गायी शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या जाळणं फार महत्वाचं आणि शुभ मानलं जातं. या मागे काही वैज्ञानिक कारणं पण आहेत. पण यापुढेही जात उत्तर प्रदेशातल्या हाथरस गावातल्या महिलांना गायीच्या शेणापासून चक्क लाकूड बनवलं आहे. होळीमध्ये मोठ्या प्रामाणात लाकूड जाळलं जातं. त्यावर पर्याय म्हणून हा नवा प्रकार उत्तर प्रदेशात समोर आला आहे. तेथील महिला गोशाळेतील शेण गोळा करून त्यापासून गोकाष्ट बनवत आहेत. सरकारी होळीसाठी या लाकडाचा वापर केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय अंत्यसंस्कारासाठीही याचा उपयोग केला जाणार आहे.जिल्हाधिकारींचा पुढाकार

  • हाथरसच्या जिल्हाधिकारी अर्चना वर्मा यांनी याकामासाठी पुढाकार घेतला. महिलांच्या समुहाद्वारे पराग डेअरी इथल्या गायीच्या शेणापासून या काठ्या बनवण्यात येत आहेत.

  • यामुळे वृक्षतोड कमी होऊन धूरही कमी होणार असल्याने पर्यावरण रक्षणातही हातभार लागेल.

  • स्वयं समुहाच्यावतीने या उपक्रमाकडे महिलांसाठी नवरोजगार संधी म्हणून बघितलं जात आहे.

  • आतापर्यंत या महिलांनी ६ टनापेक्षा जास्त काठ्या बनवल्या आहेत.

असं बनवलं जातं शेणापासून लाकूड

  • यासाठी शेण २ दिवस सुकवलं जातं.

  • ओलावा कमी झाल्यावर मशीनमध्ये फिरवलं जातं.

  • काठी बनवल्यावर सुकण्यासाठी उन्हात ठेवलं जातं.

  • यातून मिळणाऱ्या रक्कमेतील ८० टक्के भाग या महिलांना दिला जाणार असल्याचं स्थानिक प्रशासनाने सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने