आता भारतातसुद्धा भुकंप? तुर्कीची भविष्यवाणी करणाऱ्याचे मोठे विधान,

दिल्ली:  काही दिवसापूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंप झाला आणि अख्ख जग हादरलं. आतापर्यंत मृतांचा आकडा 21 हजारांच्या घरात गेलाय यातच एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे तुर्कीनंतर आता भारतातही भूकंप होणार असल्याचं म्हटलंय.तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या व्यक्तीनेच याविषयी खूलासा केलाय. अर्थातच हा खुलासा धक्कादायक आहे.तुर्की, सीरियामध्ये भूकंपाचे भाकीत करणारे डच संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी आता भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानबाबतही अशीच भविष्यवाणी केली आहे. या संदर्भातला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही शॉक बसेल.मुळात तुर्कीविषयीची भविष्यवाणी खरी ठरल्याने आता भारतात भूकंप होणार असल्याची भविष्यवाणीही खरी ठरू शकते. त्यामुळे हे खूप भीतीदायक आहे.भारतात 'या' राज्यांना भूकंपाचा सर्वाधिक धोका

भारतातीलही अनेक राज्ये भूकंपाच्या बाबतीतही अत्यंत संवेदनशील आहेत. देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे.झोन 5 मध्ये सर्वात तीव्र भूकंप होतात. गुजरात, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, मणिपूर, नागालँड, जम्मू आणि काश्मीर आणि अंदमान आणि निकोबार झोन-5 मध्ये येतात. मध्य हिमालयीन प्रदेश हा भूकंपदृष्ट्या जगातील सर्वात सक्रिय प्रदेशांपैकी एक आहे.राजधानी दिल्लीतही भूकंपाचा धोका आहे. दिल्ली-एनसीआर हिमालयाजवळ असल्याने टेक्टोनिक प्लेट्समधील बदल येथे जाणवतात. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने