अमेरिका, हाँगकाँगनंतर 'या' खतरनाक व्हायरसची दिल्लीत एन्ट्री

नवी दिल्लीः दिल्लीमध्ये सध्या श्वसनाशी संबंधित रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतल्या वातावरणातदेखील सतत बदल होत असल्याने एका नव्या व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे.इन्फ्लूएंझा व्हायरसचा नवा व्हेरिएंट सध्या दिल्लीकरांची डोकेदुखी वाढवत आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार या वर्षी जानेवारी महिन्यात इन्फ्लूएंझाच्या नव्या व्हेरिएंटने दिल्लीत एन्ट्री केली. या व्हायरसचं नाव H3N2 इन्फ्लूएंझा असं आहे.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एच३एन२ इन्फ्लूएंझा व्हायरस हा एक प्रकारचा फ्लू आहे. प्रामुख्याने या व्हायरसचे चार प्रकार पडतात. A, B, C आणि D.H3N2 हा इन्फ्लूएंझा व्हायरस टाईप A चा सब व्हेरिएंट आहे. हा विषाणू पक्षांपासून प्रत्येक श्वास घेणाऱ्या जीवाला बाधित करु शकतो.तज्ज्ञांच्या मतानुसार हा व्हायरस ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये पसरु शकतो. याबरोबर गंभीर आजारी, स्मोकर्स, शुगर पेशंट, श्वसनाचे आजार असलेले रुग्ण यांना जास्त धोकेदायक आहे. या लोकांसाठी H3N2 व्हायरस धोकेदायक ठरु शकतो.हा व्हायरस थेट नाक, गळा यावर अटॅक करतो. सर्दीत ताप, नाकातून पाणी येणे, अंगदुखी, खोकला ही याची प्रमुख लक्षणं आहेत. दिल्लीमध्ये या व्हायरने डोकेदुखी वाढवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने