शो च्या मेकर्सवर जय भानुशालीनं काढली खुन्नस..विनरचं नाव घेत केला शॉकिंग खुलासा

मुंबई: बिग बॉस १६ च्या ग्रॅंड फिनालेमध्ये यंदा ट्रॉफी कोण जिंकणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. बिग बॉस पुन्हा एकदा वादात आलंय ते मेकर्स निकालात भेदभाव करत असल्यामुळे.मेकर्स चॅनलच्या चेहऱ्याला जिंकवण्यासाठी वाटेल ते घडवून आणू शकतात असा देखील आरोप होतोय. आणि हे आरोप केवळ प्रेक्षक नाहीत तर बिग बॉसच्या आधीच्या सिझनचा सदस्य राहिलेला जय भानुशाली देखील करताना दिसला आहे.काही दिवसांपूर्वीच बिग बॉस विनर कोण असणार यासंदर्भात जय भानुशालीला विचारलं गेलं तेव्हा त्यानं मेकर्स आणि वाहिनी विरोधात अनेक प्रश्न निर्माण केले.काही दिवसांपूर्वीच एका रिपोर्टरनं जय भानुशालीला प्रश्न केला होता. अर्चना गौतम, शिव ठाकरे, स्टॅन की प्रियंका चाहर कोण असेल बिग बॉस १६ चा विनर? यावर जयनं पटकन म्हटलं की, ''यामधून कलर्स वाहिनीसाठी काम करणारा कोण आहे?'' तेव्हा रिपोर्टर पटकन म्हणाला,''प्रियंका चाहर...'',तेव्हा जय लागलीच म्हणाला,''बस्स..मग तिच यंदाचा सिझन जिंकणार. आणि त्यातनंच जर संधी मिळाली तर नशिबानं शिव ठाकरे जिंकू शकतो''.सोशल मीडियावर बरेच नेटकरी प्रियंका चाहर चौधरीला बिग बॉसचा विनर संबोधताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बॉसचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला होता.

ज्यामध्ये व्हिडीओच्या सुरुवातीला ट्रॉफी सोबत पहिल्या नंबरवर प्रियंका तर दुसऱ्या नंबरवर स्टॅन दिसत होता. या व्हिडीओला पाहून बोललं जात होतं की प्रियंका जिंकणार हे जवळ-जवळ पक्कं झालंय.बिग बॉस शो संबंधित ब्रेकिंग बातम्या देणाऱ्या एका वेबसाईटनं देखील प्रियंका चाहर चौधरीच जिंकणार अशी भविष्यवाणी केली होती. 'द खबरी' नुसार फर्स्ट रनर अप शिव ठाकरे तर दुसऱ्या नंबरवर स्टॅन असणार. तर अर्चना,शालीन यांचा त्यानंतर नंबर लागेल असं म्हटलं होतं.आता हे काही पहिल्यांदाच घडत नाहीय जिथे बिग बॉस मेकर्सच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आहे. याआधी देखील शो वर चॅनलच्या मालिकेत काम करणाऱ्या चेहऱ्याला जिंकवण्याचा आरोप केला गेला होता.कितीतरी नेटकरी दावा करत आहेत की दीपिका कक्कर,रुबीना दिलैक,सिद्धार्थ शुक्ला पासून अनेकजण कलर्स चॅनेलशी जोडलेले असल्यामुळे याचा त्यांना फायदा झालेला पहायला मिळाला.असो,या सगळ्या आरोपांवर बिग बॉसच्या मेकर्स कडून नेहमी हेच सांगण्यात आलं की शो मध्ये प्रत्येक निर्णय हा प्रेक्षकांच्या वोटिंगवर आधारित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने