कारनं नव्हे हेलिकॉप्टरमधून रोज सेटवर येणारा एकमेव अभिनेता! बॉलीवूडचे कलाकारही फिके

मुंबई: मनोरंजन विश्वामध्ये असे काही अभिनेते आहेत त्यांची गोष्टच वेगळी आहे. वयाची साठी ओलांडली तरी त्यांचा उत्साह आणि प्रभाव काही कमी झालेला नाही. टॉलीवूडमधील एका अभिनेत्यानं तर वयाच्या साठीतही बॉलीवूडला जोरदार टक्कर दिली आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ या अभिनेत्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. केवळ टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडमध्ये देखील त्यांचे असंख्य चाहते आहेत.गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सुरु आहे. अखेर त्या वादावर त्या अभिनेत्यानं तिखट प्रतिक्रिया दिली आणि तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांचे नाव कमल हासन असे आहे. त्यांच्या विक्रम या चित्रपटानं तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई करुन मोठा विक्रम केला होता. त्यानंतर त्यांच्या इंडियन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. त्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.कमल हासन यांचे जेवढे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. त्यांचे दिसणे, त्यांचा अभिनय, त्यांची देहबोली हे सारं चाहत्यांना आकर्षित करणारं आहे. त्यामुळेच की काय एवढ्या वर्षानंतर देखील त्यांच्या नावाची जादु काही कमी झालेली नाही. आता कमल हासन हे एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. ते म्हणजे चित्रिकरणासाठी हॅलिकॉप्टर घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे. चाहत्यांनी देखील ही गोष्ट बारकाईनं अधोरेखित केली आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे.

केवळ मनोरंजन विश्वच नाहीतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातही कमल हासन यांचे योगदान मोठे आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्यानंतर टॉलीवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय म्हणून कमल हासन यांचे नाव घ्यावे लागेल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या विक्रम चित्रपटानं चारशे कोटींची कमाई केली असून ते आता इंडियन २ च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. त्या चित्रपटाची शुटींग पूर्ण करण्यासाठी ते सेटवर रोज हॅलिकॉप्टर घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे.कमल हासन यांचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानं चाहत्यांना ती गोष्ट कळली आहे. त्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने