दोन दिवसांत बदला! काश्मिरी पंडित शर्मांच्या मारेकऱ्याचा खात्मा

पुलवामा: पुलवामा येथे रविवारी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची हत्या करणाऱ्या दहशतवादी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत मारला गेला आहे.आकिब मुस्ताक भट असे चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. मुस्ताक पूर्वी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवादी संघटनेसोबत काम करत होता. सध्या तो टीआरएफ नावाच्या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे ADGP नी सांगितले.    लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुरक्षा दलासोबत चकमकीत एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. तर, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी अजूनही ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे दोन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. त्यात आकीब मुस्ताक भट नावाचा दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने