मविआला कोकणात पहिला धक्का; विधान परिषदेत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

मुंबई: राज्यात सध्या सर्वांचं लक्ष शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीकडे लागलेले असताना आता या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून, या निकालात मविआला धक्का बसला आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले असून, त्यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांना पराभूत केलं आहे.विजयानंतर म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोकण मतदारसंघातील शिक्षकांच्या एकजुटीमुळे हा विजय झाला आहे. त्यामुळे या सर्वांचे आभार म्हात्रे यांनी यावेळी मानले. या मतदारसंघात आजपर्यंत फक्त शिक्षक आमदार झाले आहेत. तीच परंपरा शिक्षकांनी राखल्याचा दावा म्हात्रे यांच्या बंधूंनी विजयानंतर केला आहे.तर, पराभूत बाळाराम पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कोकणच्या शिक्षकांचा कौल खुल्या दिलानं मान्य असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच आलेला निकाल मान्य करून पुढे मार्गक्रमण करण्याचा विचार आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने