सैफचा मेव्हणा झाला दिग्दर्शक! 'मडगाव एक्सप्रेस'ची उत्सुकता

मुंबई:  बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू लवकरच एक्सेल एंटरटेनमेंटचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'मडगाव एक्सप्रेस'द्वारा दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तसेच, जवळपास वर्षभर शूटिंग करण्यात आलेल्या या सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. एक्सेल एंटरटेनमेंटने, अनेक दशकांपासून आपल्या वेधक कथानकांसह नवी पातळी गाठली आहे. अशातच, कुणाल खेमू दिग्दर्शित 'मडगाव एक्स्प्रेस'या सिनेमाने दर्शकांची उत्कंठा वाढवली आहे.कुणाल खेमूने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटातील कलाकार, क्रू आणि इतर टीम मेंबर्ससह एक फोटो शेअर केले आहेत. 


'मडगाव एक्सप्रेस'या सिनेमाद्वारा इंडस्ट्रीतील काही उत्कृष्ट कलाकारांना एकत्र पाहायला मिळेल. तसेच, चित्रपटाच्या मनोरंजक टायटलने प्रेक्षक उत्साही झाले असून, प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.फरहान अख्तरने 2001 मध्ये 'दिल चाहता है'या चित्रपटामार्फत दिग्दर्शनात पदार्पण केले होते. अशातच, आता कुणाल खेमू एक्सेल द्वारे दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी सह-स्थापित एक्सेल एंटरटेनमेंटने 'झेडएनएमडी', 'दिल चाहता है', 'डॉन', 'डॉन 2' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच, सध्या प्रॉडक्शन हाऊस मोस्ट अवेटेड 'जी ले जरा'साठी तयारी करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने