तारक मेहता फेम शैलेश लोढाने घेतला संन्यास? फोटो व्हायरल! नेटकरी संभ्रमात

मुंबई: सोनी टी.व्हीवर येणारा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ही मालिका सर्वात लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा चाहता वर्ग तगडा आहे. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सारेच या मालिकेचा आनंद घेतात मात्र या शोमधून अनेक कलाकार बाहेर पडले ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांचे मनोरंजन केले होते.आता त्यात शैलेश लोढा यांच्याही नावाचा सामवेश आहे. तारक मेहताचं पात्र त्यांनी साकारलं आणि ते घराघरात लोकप्रिय केलं. शैलेश आणि शोच्या निर्मात्यांमध्ये बराच वाद सुरु आहे. शुल्काबाबत काही तरी गैरसमज झाला असल्याचं बोललं जात आहे. त्याचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते साधूच्या वेशात दिसत आहे.शैलेश यांनीच त्याचा लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो एका मंदिरातील आहे जिथे शैलेश हे जमीनीवर बसून ध्यानात मग्न झालेले दिसत आहे. त्यांनी संन्याशांचे भगव्या रंगाचे कपडे घातले परिधान केले आहेत आणि त्यांच्या कपाळावर भस्मही लावले आहे. या दरम्यान ते ऐकाग्रतेने ध्यान करतांना दिसत आहे.या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे- मनाची शक्ती द्या, मन जिंका... त्याचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहते त्यावर भरपूर कमेंट करताना दिसत आहेत. काही लोकांचा असाही समज आहे की, 'शैलेश सन्यास तर घेतला नाही.एका हिंदी वृत्त वाहिनीला मिळालेल्या बातमीनुसार शैलेश लोढा जून पासून शेमारू वाहिनीवर सुरू होणाऱ्या एका कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत. हा शो कवितांवर आधारित असणार आहे. या शो च्या माध्यमातून नव्या कवींसाठी प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शैलेश लोढा गेल्या एक आठवड्यापासून या शो चे शूटिंग करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने