PNB आणि बँक ऑफ बडोदाचा ग्राहकांना झटका; RBI च्या घोषणेनंतर घेतला मोठा निर्णय

दिल्ली:   रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केल्यानंतर बँकांकडून व्याजदरात वाढ करण्यात येत आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर एचडीएफसी बँकेने लगेचच व्याजदर वाढवण्याची घोषणा केली होती.आता सार्वजनिक क्षेत्रातील बड्या बँका पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ बडोदा (BoB) यांनी कर्जावरील व्याजात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. पीएनबी आणि बँक ऑफ बडोदाने रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.नवे दर 9 फेब्रुवारीपासून लागू :

पीएनबीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, रेपो रेट आधारित व्याजदर (RLLR) 8.75 टक्क्यांवरून 0.25 टक्क्यांनी वाढवून 9.0 टक्के करण्यात आल्याचे सांगण्यात आले.नवे दर 9 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने बुधवारी रेपो दर 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.5 टक्के केला होता.BoB ने फंडाचा किरकोळ खर्च आधारित व्याजदर (MCLR) 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने शेअर बाजाराला सांगितले की, नवीन दर 12 फेब्रुवारीपासून लागू होतील.

हे आहेत नवीन दर :

आता कर्जासाठी MCLR 7.85 टक्क्यांवरून 7.90 टक्के करण्यात आला आहे. एका महिन्यासाठी MCLR 8.15 टक्क्यांवरून 8.20 टक्के करण्यात आला आहे.BoB ने तीन महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जावरील MCLR 8.25 टक्क्यांवरून 8.30 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्याचबरोबर एक वर्षाच्या कर्जावरील व्याज आता 8.50 टक्क्यांऐवजी 8.55 टक्के करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने