कंगनाच्या 'लॉक अप सीझन 2' मध्ये दिसणार 'बिग बॉस 16'ची ही प्रसिद्ध स्पर्धक

मुंबई : बिग बॉस 16 संपून 4 दिवस झाले आहेत. शोमधील प्रत्येक सदस्याला काम मिळात आहेत काहींना चित्रपटात, काहींना मालिकांमध्ये. मात्र, बिग बॉसच्या घरात पोहोचलेली अर्चना गौतम या बाबतीत रिकामीच राहिली. तिने घरी अनेक ऑडिशन्स दिल्या पण एकाही ऑडिशन्समध्ये तिची निवड नाही झाली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्चना गौतमला एकता कपूरने तिचा रिअॅलिटी शो लॉक अप सीझन 2 साठी पसंत केले आहे. तिने अर्चनाला आपला शो ऑफर केला आहे. यावर अर्चनाने काय उत्तर दिले हे माहीत नाही, पण कंगनाच्या जेल मध्ये ती दिसणार असल्याची शक्यता आहे. अर्चना आपल्या विधानसभा मतदारसंघात बिकिनी क्वीन या नावाने प्रसिद्ध आहे.अर्चना गौतमला बिग बॉस 16 मधील सर्वात मनोरंजक स्पर्धकांपैकी एक म्हणून पाहिले जाते. काही लोक तर तिला विजयी मानत होते. अर्चनाही टॉप 5 मध्ये पोहोचली होती पण नंतर ती बाहेर पडली. आता 'लॉक अप 2' मध्ये बिग बॉसच्या घरातील ही सिलबट्टा गर्ल काय कहर करते, हे येणारा काळच सांगेल, कारण जिथे अर्चना आहे, तिथे वाद होणार नाही असे शक्य नाही.लॉक अप 2 बद्दल बातमी आहे की ते मार्चच्या मध्यात सुरू होणार आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गेल्या सीझनचे हॉट टॉपिक कंगना होती. अशा परिस्थितीत तिचं आणि अर्चनाचं नातं कसं असणार हे पाहणंही रंजक ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने