बजेटपूर्वीच देशात 'या' नियमांमध्ये बदल; LPG किमतीबाबत मोठी अपडेट

दिल्ली: देशात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला काही नियमांमध्ये बदल होत असतात. त्यात आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.मात्र, त्याआधीच देशतील काही नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. बदललेल्या या नियमांचा थेट परिणाम सर्व सामान्यांवर होत असतो. आज नेमक्या कोणत्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. त्याबद्दल थोडक्यात.आज बदल झालेल्या नियमांमध्ये वाहने चालवण्यापासून ते स्वयंपाकाचा गॅस आणि क्रेडिट कार्डसह अनेक बदल करण्यात आले आहेत.

स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती

बजेटपूर्वी गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत मोठी माहिती समोर येत आहे. अर्थसंकल्पापूर्वी सरकार गॅस सिलिंडरच्या दरात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देऊ शकेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती, मात्र फेब्रुवारी महिन्यातही गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. तसेच तेल कंपन्यांनी सिलिंडरच्या किमतीत वाढदेखील केलेली नाही.
नोएडा स्क्रॅप धोरण

आजपासून नोएडातील रहिवाशांसाठी मोठा बदल करण्यात आला आहे. आजपासून म्हणजे १ फेब्रुवारी २०२३ पासून परिवहन विभाग गौतम बुद्ध नजर यांच्या नेतृत्वाखाली भंगार धोरणांतर्गत कारवाई सुरू करणार आहे. या अंतर्गत नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये आजपासून १५ वर्षे जुनी पेट्रोल आणि १० वर्षे जुनी डिझेल वाहने भंगारात जाणार आहेत.

गाड्यांच्या किमती वाढल्या

जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, याचा फटका तुमच्या खिशावर बसू शकतो. कारण आजपासून प्रवासी वाहने खरेदी करणाऱ्यांना जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.जर तुम्ही टाटा मोटर्स वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, कंपनीने प्रवासी वाहनांच्या ICE पोर्टफोलिओच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा या आधीच केली आहे. जी आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे टाटा मोटर्सच्या वाहनांच्या व्हेरियंट आणि मॉडेलनुसार, किमतीत 1.2 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

BOB क्रेडिट कार्डधारकांना धक्का

याशिवाय, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर, आजपासून क्रेडिटकार्डद्वारे भाडे भरल्यावर कोणताही रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीये. तसेच क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरल्यास १ टक्के शुल्क भरावे लागणार आहे. हा नियम १ फेब्रुवारी २०२३ पासून बँक ऑफ बडोदाच्या (BOB)क्रेडिट कार्डधारकांसाठी लागू झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने