शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठीच गद्दारी केली

मुंबई:  बंडखोरीनंतर शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख मविआ नेत्यांकडून गद्दार असा केला जात आहे. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो हा तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.या टीकेवरून अनेकदा शिंदे गट आणि मविआ नेत्यांमध्ये वादाचे प्रसंगदेखील पाहण्यास मिळाले आहेत. मात्र, आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी या टिकेला उत्तर दिले आहे.गुलाबराव म्हणाले की, मी गद्दार झालो नाही तर, एक मराठ चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता आणि त्याला मुख्यमंत्री करण्यासाठीच मी गद्दारी केली असे स्पष्ट उत्तर गुलाबराव पाटील यांनी टीका करणाऱ्यांना दिले आहे. ते जळगावात एका कार्यक्रमात बोलत होते."तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला असे म्हणत एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केल्याची कबुली गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने