'मराठी माणूस तुम्हाला शब्द देतो, मी...' बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे भावूक

मुंबई: मराठी बिग बॉसचा विजेता असलेला शिव ठाकरे हिंदी बिग बॉसमध्ये देखील प्रभावी कामगिरी करताना दिसतो आहे. त्याचे बिग बॉसमध्ये चमकणे हे त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. अशातच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये शिव ठाकरेनं प्रेक्षकांना आणि चाहत्यांना केलेलं आवाहन चर्चेत आलं आहे.गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला बिग बॉस हिंदीचा १६ वा सीझन हा आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामधील संभाव्य विजेता म्हणून शिव ठाकरेकडे पाहिले जाते. बिग बॉसच्या घरात तो चमकला आहे. त्याचा परफॉर्मन्स हा नेहमीच चाहत्यांना प्रभावित करणारा ठरला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवनं आता प्रेक्षकांना आणि चाहत्यांना एक मराठी माणूस म्हणून आवाहन केले आहे. तोच नाही बाकीच्या सर्व स्पर्धकांनी यावेळी आपली प्रादेशिक अस्मिता दाखवत प्रेक्षकांना आवाहन केले आहे.प्रेक्षकांना आवाहन करताना शिव म्हणाला की, एक मराठी माणूस म्हणून तुम्ही आजवर मला जे प्रेम दिले आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी तुम्हाला शब्द देतो की, मला आपल्या माणसांसाठी एक कलाकार म्हणून जे काही करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल. मी माझ्या चाहत्यांना काही केल्या नाराज करणार नाही. असा शब्द तुम्हाला देतो. यावेळी देखील मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. असेही शिवनं यावेळी म्हटले आहे.दुसरीकडे शिवबाबत काही जणांनी शंकाही व्यक्त केली आहे. ऐन शेवटच्या टप्प्यात त्याची कामगिरी खालावलेली दिसते आहे. त्यामुळे तो विजेता होईल की नाही याबाबत शंका आहे. त्याचा स्वताचा असा वेगळा स्टँड किंवा गेम प्लॅन दिसत नाही. यामुळे भलेही तो चर्चेत असेल पण जिंकेल की नाही याबाबत अजुन ठामपणे सांगता येणार नाही. असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने