पहिल्यांदाच आई सोबत काम करणार विराजस.. या मराठी सिनेमात माय - लेक एकत्र

मुंबई:  माझा होशील ना फेम अभिनेता विराजस कुलकर्णी त्याच्या फॅन्सशी नेहमीच संवाद साधत असतो. विराजसने सोशल मीडियावर त्याच्या फॅन्सशी नुकताच एक प्रश्न - उत्तरांचं सेशन केलं.यामध्ये विराजसने त्याच्या फॅन्ससोबत दिलखुलास संवाद साधला. एका फॅनने विराजसला त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल विचारलं. तेव्हा विराजसने थेट आगामी सिनेमातला लूक शेयर करून सर्वांना एक सुखद धक्का दिला.विराजसला त्याच्या फॅनने आगामी प्रोजेक्ट बद्दल विचारलं. तेव्हा विराजसने उलगडा केला कि तो सुभेदार सिनेमात महत्वाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात विराजसचे ४ वेगवेगळे लूक पाहायला मिळतील.याशिवाय सुभेदार चं शूटिंग संपलं का? असा प्रश्न विराजसला एका फॅनने विचारला. त्यावेळी विराजसने थेट सिनेमातला त्याचा लूक व्हायरल करून माझं शूट संपलं असं त्याच्या फॅनला सांगितलं.अशाप्रकारे विराजस आगामी सुभेदार सिनेमात अभिनय करतोय. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील सुभेदार हा पाचवा सिनेमा आहे. गड आला पण सिंह गेला म्हणजेच तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारीत हा सिनेमा आहे.विराजसचे या सिनेमात ४ लूक आहेत, याचाच अर्थ विराजस बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सुभेदार सिनेमात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या पुन्हा एकदा राजमाता जिजाऊसाहेबांची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे सुभेदार निमित्ताने विराजस पहिल्यांदाच आई मृणाल कुलकर्णी सोबत अभिनय करताना दिसणार असल्याची दाट शक्यता आहे. जून २०२३ ला सुभेदार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.विराजसने काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री शिवानी रांगोळे सोबत लग्न केलंय. शिवानी सुद्धा झी मराठीवर तुला शिकवीन चांगलाच धडा या आगामी मालिकेत झळकणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने