राज ठाकरे यांचं सोनाली बेंद्रेशी लग्न का होऊ शकलं नाही?

मुंबई: सध्या व्हॅलेटाइन वीक सुरु आहे. या वीकला प्रेम युगूलांचा आठवडा असेही म्हणतात. व्हॅलेटाइन वीकच्या निमित्त्याने आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लव्ह लाइफच्या त्या चर्चांचा तो किस्सा जाणून घेऊयात. एके काळी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या लव्ह अफेअरच्या चर्चा फार होत्या.नव्वदच्या दशकातला तो असा काळ होता जेव्हा ठाकरे घराण्यातील या तरुण नेत्याची प्रेमकहाणी खूप चर्चेत असायची. राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे 90 च्या दशकात प्रेमसंबंधात होते असे म्हटले जाते. सोनाली बेंद्रेच्या फिल्मी करिअरला पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनीही खूप मदत केली होती, असंही म्हटलं जातं.लग्न करूनही राज ठाकरे प्रेमात पडले होते?

राज ठाकरे किंवा सोनाली बेंद्रे या दोघांनीही हे नातं कधी जाहीरपणे उघडही केलं नाही तसेच स्वीकारलंही नाही. मात्र, दोघांच्याही प्रेमात असल्याच्या बातम्या अनेकदा उडायच्या. सोनाली बेंद्रेचा 'आग' हा पहिला चित्रपट पाहून राज ठाकरे वेडे झाल्याचे बोलले जाते. दोघांचे प्रेमप्रकरण चांगले चालू होते. मायकल जॅक्सन भारतात शो करण्यासाठी आला होता, तेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरे यांच्यासोबत विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी आली होती, यावरूनही दोघांच्या जवळीकीचा अंदाज लावता येतो.त्या कार्यक्रमाची दोघांच्या सोबतच्या छायाचित्रांनी आणि व्हिडिओ फुटेजने त्या काळात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. मायकल जॅक्सन या पॉप स्टारला रिसीव्ह करण्यासाठी ठाकरे आणि सोनाली पारंपरिक लूकमध्ये पोहोचले होते. राज ठाकरेंनी कुर्ता-पायजमा व नेहरू जॅकेट घातले होते, तर सोनालीने मराठी साडी नेसली होती आणि केसात गजरा माळला होता .

लग्न होऊनही राज ठाकरे सोनालीच्या प्रेमात वेडे होते, असे बोलले जाते. ठाकरे यांनाही सोनालीशी लग्न करायचे होते पण त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा लग्न करण्यापासून रोखले होते, असे बोलले जाते. यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर वाईट परिणाम होऊन त्यांच्या समर्थकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगितले होते.राज ठाकरे यांचे शर्मिला ठाकरे यांच्याशी लग्न झाले असून दोघांना दोन मुले आहेत. राज ठाकरेंसोबत ब्रेकअप केल्यानंतर सोनालीने तिच्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि 2002 मध्ये तिने दिग्दर्शक आणि निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न केले. दोघांनाही एक मुलगा आहे ज्याचे फोटो ती अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने