"नवीन पायंडे पाडू नये..." ; पुणे पोलिसांच्या मास्टर प्लॅनवर अजित पवार संतापले

पुणे: पुणे शहरात कोयता गँगची दहशत वाढत आहे. तरुण हातात धारदार शस्त्रे (कोयता) घेऊन दहशत पसरवताना दिसत आहेत. तसेच याशिवाय चोरटे धारदार शस्त्रे दाखवून रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना धमकावतात त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोयता गँगला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी मास्टर प्लन आखला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, "एखादा गुंड अजिबातच सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते तेव्हा अशा प्रकारचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नये."पुणे पोलिसांच्या मास्टर प्लॅन काय?

कोयता बाळगणार्‍याला पकडा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना पुणे पोलिसांनी आखली आहे. हत्यार बाळगणाऱ्या गुंडाना पकडणार्‍या पोलिसांवर आता पोलीस विभाग बक्षीसांची खैरात करतील. पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून कोयता गँगने धुमाकूळ घातला असून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या योजनेनुसार, पिस्तूल जवळ बाळगणार्‍या गुंडाला पकडल्यास दहा हजार तर, कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. 

बक्षिसाचे स्वरूप...

  • शस्त्र अधिनियम कलम ३, २५ नुसार दहा हजार रुपये

  • शस्त्र अधिनियम कलम ४,२५ नुसार तीन हजार रुपये

  • फरारी आरोपीस पकडणे १० नुसार हजार रुपये

  • पाहीजे आरोपीस पकडणे ५ हजार रुपये

  • मोक्कातील आरोपी पकडणे ५ हजार रुपये

  • एमपीडीएतील आरोपी पकडणे ५ हजार रुपये

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने