खेळ दमदार व्हायलाच हवा! नरेंद्र मोदी हजर राहणार

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका (बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी)  ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलिया सध्या कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत या दोन संघांमधील ही मालिका खूपच रंजक असणार आहे. तसेच अनेक कारणांमुळे ही कसोटी मालिका चर्चेत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही ऍशेस नंतरची कसोटी क्रिकेटमधील दुसरी सर्वाधिक वर्चस्व असलेली मालिका आहे. अशा परिस्थितीत जेव्हा-जेव्हा हे दोन्ही संघ कसोटी क्रिकेटमध्ये आमनेसामने येतात, तेव्हा क्रिकेट जगताचे डोळे या मालिकेकडे लागलेले असतात.दरम्यान इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र देखील हा सामना पाहायला येणार आहे. मालिकेतील चौथा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी हजर असतील.  बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला हा चौथा महत्वाचा सामना असेल. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान एन्थोनी अल्बानीज सुद्धा या टेस्ट मॅचला उपस्थित राहतील. अहमदाबाद मधील नूतनीकरण केलेल्या स्टेडियमला ​​त्यांचे नाव दिल्यानंतर नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या सामन्याला उपस्थित राहतील. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही मालिका ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाचे पुढील चार कसोटी सामने नागपूर, दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे होणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने