एमसी स्टॅन लाईव्ह आला अन् भल्याभल्यांना रेकॉर्ड मोडून गेला...शाहरुखही पडला मागे

मुंबई: बिग बॉस 16 चा सिझन आपल्या चाहत्यांच्या प्रेमामुळं जिकलेला एमसी स्टॅन सध्या चर्चेत आहे. त्याने काहीही केलं तरी तो एक रेकॉर्ड होतं आहे. काही दिवसांपुर्वी त्याच्या व्हिक्टरी पोस्टला जास्तीत जास्त लाईक्स मिळाले. या माध्यमातुन त्याने या आधीच्या शोच्या विजेत्यांनाही मागे सोडले तर विराट कोहलीच्या पोस्टपेक्षाही त्याच्या पोस्टला जास्त लाईक्स होते. आता पुन्हा त्याने एक नवीन रेकॉर्ड केला.एमसी स्टॅनने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड मोडला आहे. बिग बॉस 16 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टॅन नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इंस्टाग्रामवर लाइव्ह आला. यादरम्यान त्याच्यासोबत इतके चाहते सामील झाले की तो एक मोठा रेकॉर्ड तयार झाला. यात त्याने शाहरुख खानलाही मागे टाकले आहे.तर दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध पॉप बँड बीटीएसशी त्याने स्पर्धा केली आहे.इंस्टाग्रामवर त्याला 5 लाखांहून अधिक लोक पाहत असताना हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड त्याने त्याच्या नावे केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंस्टाग्राम लाइव्हवर सर्वाधिक लोक जॉईन करण्याचा विक्रम करणारा MC स्टॅन हा पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहेएमसी स्टॅनने लाईव्ह येऊन सर्व चाहत्यांचे आभार मानले. त्याने देशाचे आणि जनतेचे आभार मानले आणि इतके प्रेम मिळाल्याने आनंद होत असल्याचंही सांगितले. यासोबतच त्याने त्याच्या स्टुडिओची झलक यावेळी दाखवली आणि सांगितले की तो काही काम करत आहे. लवकरच तो एक नवीन गाणं चाहत्यांसाठी घेऊन येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने