झोमॅटोच्या शेअर्समध्ये येणार तेजी, फक्त 89 रुपयांमध्ये देणार चांगल्या क्वालिटीचे जेवण

मुंबई: झोमॅटोच्या (Zomato) शेअर्सने अतिशय वाईट काळ पाहिला, पण हे दिवस लवकरच मागे पडतील असा विश्वास शेअर बाजार एक्सपर्ट्स व्यक्त करत आहेत. कारण झोमॅटोचे शेअर्स शुक्रवारी बीएसईवर पहिल्या सेशनमध्ये 3 टक्क्यांनी वधारले.झोमॅटो सध्या ग्रोथवर फोकस करत आहे. झोमॅटोने नुकतीच झोमॅटो एव्हरीडे ही खास सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत तुम्हाला फक्त 89 रुपयांपासून चांगल्या क्वालिटीचे जेवण मिळेल.कंपनीने गुडगावमधील निवडक भागात ही सेवा नुकतीच सुरू केली आहे. पण त्यानंतर शेवटच्या सेशनदरम्यान मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने झोमॅटोचे शेअर्स एक टक्क्याने खाली येत 54.45 रुपयांवर बंद झाले.झोमॅटोच्या एव्हरीडे या पायलट प्रोजेक्टमुळे कंपनीचा नफा वाढेल असा विश्वास ब्रोकरेज मॉर्गन स्टॅनले यांनी व्यक्त केला आहे. हा प्रयोग आहे, चालला नाही तर बंद होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले. मॉर्गन स्टॅनलीने झोमॅटोला प्रति शेअर 82 रुपयांचे टारगेट देत ओव्हरवेट रेटिंग दिले आहे.झोमॅटो आपल्या गोल्ड लॉयल्टी प्रोग्रामवर भर देत असल्याचे ग्लोबल ब्रोकरेज सिटीने सांगितले. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत त्यांचे ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू (GOV) 50 बेसिस पॉइंट्सने कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. सिटीने शेअरला 'बाय' रेटिंग देत 76 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

तुम्ही कमी वेळेत आणि कमी खर्चात घरगुती जेवणाचा आनंद घेऊ शकता असे झोमॅटो एव्हरीडेच्या लाँचिंगच्या वेळी सीईओ आणि संस्थापक दीपंदर गोयल म्हणाले. अन्न बनवण्यासाठी उत्तम साहित्य वापरले जाते, त्यामुळे तयार केलेला पदार्थ चविष्ट आणि चांगल्या गुणवत्तेचा असतो असेही ते म्हणालले.नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने