वाईट काळ संपला फक्त...! MS धोनीबाबत विराट कोहलीने केला मोठा खुलासा

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने 2022च्या आशिया चषक स्पर्धेत शतक झळकावून जवळपास तीन वर्षे चाललेला धावांचा दुष्काळ संपवला.पण विराट कोहली त्याचा वाईट काळ विसरलेला नाही आणि वाईट काळात त्याला साथ देणारी व्यक्तीही विसरलेला नाही. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून एमएस धोनी आहे. विराटने अनेकवेळा एमएस धोनीबद्दल खुलेपणाने बोलले आहे. यावेळीही त्याने धोनीबाबत मोठा खुलासा केला आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा केला. त्याने सांगितले की, गेल्या वर्षी जेव्हा तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात होता तेव्हा फक्त माहीने त्याच्याशी संपर्क साधून त्याला प्रोत्साहन दिले होते. विराट कोहली या पॉडकास्टमध्ये म्हणाला, 'एमएस धोनी हा एकमेव व्यक्ती होता जो 2022 मध्ये माझ्या बॅड पॅचदरम्यान माझ्याशी बोलला होता. धोनीशी शुद्ध नातेसंबंध असणे माझ्यासाठी आशीर्वाद आहे.
विराट कोहली पुढे म्हणाला, त्याचा मला मेसेज करणे ही मोठी गोष्ट आहे. असे त्याने दोनदा केले. धोनीने आपल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, जर मी त्याला कोणत्याही दिवशी कॉल केला तर तो उचलणार नाही याची 99 टक्के शक्यता आहे, कारण तो फोनकडे पाहत नाही. त्यामुळे माझ्याशी बोलणे त्याच्यासाठी खास होते. आतापर्यंत दोनदा तो मला म्हणाला, 'जेव्हा लोकांना वाटते की तुम्ही मजबूत आहात आणि ते तुम्हाला मजबूत पाहतात तेव्हा लोक विचारायचे विसरतात की तू कसा आहेस? त्याच्या बोलण्याने माझ्यावर छान छाप सोडली. यामुळे मला खूप समजायला मदत झाली.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25000 धावा पूर्ण केल्या आहेत. 50+ च्या सरासरीने 25000 धावा करणारा तो जगातील पहिला खेळाडू आहे. तो सर्वात जलद 25000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. विराट कोहलीने केवळ 549 सामन्यांमध्ये 25000 धावांचा टप्पा पार केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने