शिंदे गटाचा मनसेलाही धक्का! 'या' नेत्याने सोडली 15 वर्षाची साथ

मुंबई: गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. शिवसेनेत दोन गट पडले त्यानंतर एकनाथ शिंदे आणि समर्थक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गटाने सर्वच पक्षांना धक्का दिला आहे. अनेक आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते सातत्याने शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत.राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट, यांच्यासह आता मनसेलाही शिंदे गटाने खिंडार पाडलं आहे. रायगड जिल्ह्यातील मनसेचे पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील हे आपल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह लवकरच शिवसेनाच्या शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. रुपेश पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून मनसेमध्ये सक्रिय आहेत.पक्षांतर्गत गटबाजीमुळे मनसेतील अनेक नेते, पदाधिकारी पक्ष सोडत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून मनसे मधील अंतर्गत गटबाजी ही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक आमदार,नगरसेवक आणि महत्वाचे पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. दरम्यान याच कारणामुळे रुपेश पाटील हे देखील लवकरच पक्ष बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने