'कुणाच्या वाईट दिवसांची थट्टा उडवू नका', एकता कपूरनं अक्षयची केली पाठराखण!

मुंबई: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचा सेल्फी नावाचा चित्रपट आला आणि फ्लॉप झाल्यानं अक्षय हा नाराज झाला आहे. यंदाच्या वर्षातील त्याचा पहिलाच चित्रपट तो बॉक्स ऑफिसवर कोसळल्यानं त्यानं खंत व्यक्त केली आहे. अक्षय काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अक्षय कुमार हा चाहत्यांची सहानुभूती मिळवताना दिसतो आहे. त्याला कारण त्याचा सेल्फी फ्लॉप होणे. एका मुलाखतीमध्ये त्यानं आपण देशात सर्वाधिक टॅक्स पे करणारे कलाकार आहोत. अशावेळी लोकं जेव्हा मला कोणत्याही कारणावरुन ट्रोल करतात तेव्हा वाईट वाटते. त्यांना मी वाईट वाटू लागतो. पण मी निराश होणार नाही. अजुनही जोमानं काम करेल असे अक्षयनं म्हटले आहे.अक्षयचा सेल्फी हा २०१९ मध्ये आलेल्या मल्याळम चित्रपट ड्रायव्हिंग लायन्सेस या चित्रपटाचा रिमेक होता. सेल्फीनं आतापर्यत केवळ २.५ कोटी रुपयांचा बिझनेस केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याशिवाय अक्षयच्या गेल्या वर्षी बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, कटपुतली, रामसेतू हे चित्रपट फारसे चालले नव्हते.यासगळ्यात टीव्ही मनोरंजन क्षेत्राची क्वीन एकता कपूरनं अक्षय कुमारची बाजू घेतली आहे. तिनं अक्षयला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. ती म्हणते, लोकं बोलताना फार गांभीर्यानं विचार करत नाही. त्यांना कोणताही विषय पुरतो. अक्षय हा कलाकार मोठा आहे. त्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. अशावेळी त्याच्या प्रेरणादायी प्रवासाची टीका करणे चुकीचे आहे. अशी प्रतिक्रिया एकतानं दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने