कमी होतील का सिनेमांच्या तिकिटांचे दर?स्वस्त होणार का OTT प्लॅटफॉर्म? विश्लेषक म्हणतायत..

मुंबई:  आज १ फेब्रुवारीला संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केलं जाईल. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे अर्थसंकल्प सादर करतील. यामुळे आता अनेकजण या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेयत. कशावर सूट मिळेल तर कशाच्या किमती वाढतील यावर चर्चा जोरदार सुरू आहे.टॅक्स पॉलिसीमध्ये काही बदल होतील का? हा एक महत्त्वाचा मुद्दा या बजेटमधला. लोकांना या अर्थसंकल्पाकडून कोव्हिड १९ नंतर इकॉनॉमिक रिकव्हरी संदर्भात खूप आशा आहेत आणि यासोबतच मनोरंजन सृष्टीतही सिनेमांची तिकिटं आणि ओटीटी सबस्क्रीप्शन बाबतीत बदल होतील असा अंदाज विश्लेषक वर्तवत आहेत.

सिनेमांच्या तिकीटा विषयी बोलायचं झालं तर सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स यांच्यात खूप फरक आहे. दोघांच्या सिनेमागृहांमधील वेगळेपणा,दर्जाआणि व्यवस्थापन आदी सगळ्यात जमीन आस्मानाचा फरक आहे.विश्लेषक म्हणतायत, मनोरंजन सृष्टीकडनं केल्या गेलेल्या मागणीचा विचार करण्यात आला तर Union Budget 2023 मध्ये मल्टिप्लेक्सच्या तिकीटांचे दर कमी होऊ शकतात,ज्यामुळे सगळ्याच लोकांना मोठ्या पडद्यावर सिनेमाचा आनंद उपभोगता येऊ शकेल.Union Budget 2023 च्या माध्यमातून नवीन पॉलिसी येऊ शकते..

भारतात सिनेमांच्या तिकीटांवर सगळ्यात जास्त एंटरटेन्मेंट टॅक्स आहे. त्यामुळे आताच्या अर्थसंकल्प 2023 च्या माध्यमातून नवीन पॉलिसी येऊ शकते आणि सिनेमांच्या तिकीटांचे दर अफोर्डेबल बनवत सिनेमांच्या तिकीटांवरील एंटरटेन्मेंट टॅक्सला रेग्युलेट केलं जाऊ शकतं.ओटीटीच्या सबस्क्रीप्शन संदर्भात बोलायचं झालं तर याला घेऊन अजूनही स्पष्टता आलेली नाही. पण या Union Budget 2023 चा यावर नक्कीच परिणाम होईल असं बोललं जात आहे. तसं पाहिलं तर वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांनी आपल्या OTT Subsciption ला वेगवेगळ्या प्राईसिंग मॉडेलमध्ये बसवून स्वतःचा एक फॉर्मेट फिक्स केला आहे.

भारतीय व्युअर्स ओटीटीवर दोन मोठ्या भागात Netflix आणि Amazon Prime वर विभागाले गेले आहेत. हे दोन्ही प्लॅटफॉर्म जगभरातील दोन मोठे प्लॅटफॉर्म आहेत. कारण यांचे ओटीटी सबस्क्रीप्शन जगभरात उपलब्ध आहे.ज्याचा खरंतर थिएटर इंडस्ट्रीवर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे.जर सिनेमांच्या तिकीटांच्या किमती कमी झाल्या तर शक्य आहे की लोक सिनेमा पाहण्यासाठी तो ओटीटीवर येण्याची वाट पाहत बसणार नाही. प्रेक्षक सिनेमागृहापर्यंत खेचले जाऊ शकतात. आणि मग सिनेमांच्या तिकीटी कमी झाल्यावर ओटीटी प्लॅटफॉर्म देखील आपल्या सबस्क्रिप्शन किमती घटवतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने