मुस्लिम महिला हिजाब का घालतात?

मुंबई: आज जागतिक बुरखा दिवस आहे. स्त्रियांना हिजाब घालण्यासाठी आणि तो अनुभवण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या दिवसामागील उद्देश असतो. मुस्लिम स्त्रिया हेड स्कार्फ घालतात, त्याला आपण बुरखा, हिजाब आणि नकाब नावाने संबोधतो पण तुम्हाला माहिती आहे का मुस्लिम महिला हिजाब का घालतात? चला तर सविस्तर जाणून घेऊया. 




हिजाब म्हणजे काय?

आपण बुरखाला हिजाब म्हणून संबोधतो.पण हिजाब आणि बुरखा यामध्ये थोडा फरक आहे. हिजाब म्हणजे डोक्याला स्कार्फसारखे गुंडाळणे म्हणजेच चेहरा झाकणे तर बुरखा म्हणजे संपुर्ण चेहरा आणि अंग झाकणेआणखी एक महत्त्वाचं म्हणजे सुन्नी समाजामध्ये फक्त काळा रंगाचा बुरखा वापरण्यात येतो तर शिया किंवा बोहरी समाजात रंगीबेरंगी रंगाचा बुरखा वापरण्यात येतो.

मुस्लिम महिला हिजाब का घालतात?

कुराणमध्ये हिजाब या शब्दाचा अर्थ फक्त डोकं झाकणे, असा आहे पण नंतर मात्र परपुरुषांनी स्त्रियांकडे बघू नये, या पुरुष प्रधान मानसिकतेतून हिजाब घालण्याचं कल्चर आलं. मात्र या संदर्भात इस्लाममध्ये कुराणमध्ये असं काहीही नाही.विशेष म्हणजे हिजाब घालण्याचा नियम हा फक्त मुस्लिम महिलांनाच नाही तर मुस्लिम पुरुषांना देखील आहे पण अनेकदा महिलाच हा नियम पाळताना दिसतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने