आता स्टेटसवरून ऐकू जाणार तुमचा आवाज; आलं व्हॉट्सअ‍ॅपचं अप्रतिम फीचर

मुंबई: लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp मध्ये वेळोवेळी नव-नवीन फीचर्स लाँच केले जातात.व्हॉट्सअपच्या नवनवीन फीचर्समुळे युजर्सना चॅटिंगचा अधिक आनंद घेता येतो. व्हॉट्सअपचं स्टेटस फीचर जगभारातील करोडो यूजर्स वापरतात. या फीचरमध्ये आता नवीन अपडेट आले आहे.व्हॉट्सअप स्टेटसच्या या नव्या अपडेटमुळे आता यूजर त्यांचा आवाज ३० सेकंदांपर्यंत व्हॉईस रेकॉर्डिंग शेअर करता येणार आहे. WhatsApp च्या नव्या बीटा आवृत्तीमध्ये हे अपडेट देण्यात आले आहे.

या यूजर्सना वापरता येणार नवं अपडेट

मेसेजिंग अॅपच्या Android आवृत्ती 2.23.3.18 साठी बीटामध्ये, नवीन स्टेटस अपडेट्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. बीटा टेस्टिंग संपल्यानंतर हे अपडेट सर्वांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.कसे येणार वापरता?

स्टेटसचं नवीन अपडेटसाठी सर्वात प्रथम तुम्हाला अपडेट घ्यावं लागेल. जर तुम्ही बीटा यूजर असाल तर, अॅप उघडल्यानंतर तुम्हाला स्टेटसमध्ये जावे लागेल आणि खाली नमूद केलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे लागेल.

1. स्थिती विभागाच्या तळाशी उजवीकडे, तुम्हाला कॅमेरा आणि त्याच्या वर पेन्सिल चिन्ह दिसेल.तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ शेअर करायचा असेल तर तुम्हाला कॅमेरा आयकॉनवर टॅप करावे लागेल.

2. व्हॉईस स्टेटस ठेवण्यासाठी तुमच्या पेन्सिल चिन्हावर टॅप करणे आवश्यक आहे.

3. यानंतर मजकूर टाईप करण्याशी संबंधित विंडो उघडेल, जिथे उजव्या बाजूला 'मायक्रोफोन' चिन्ह दिसेल.

4. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग करू शकाल.

5. 30 सेकंदांपेक्षा कमी रेकॉर्ड केल्यानंतर, सेंड बटणावर टॅप करावे लागेल. यानंतर तुमचा व्हॉईस रेकॉर्डिंग स्टेटस अपडेट म्हणून दिसेल.

व्हॉईस स्टेटस ज्या यूजर्सने व्हॉट्सअप अपडेट केले आहे. त्यांनाच वापरता येणार आहे. तसेच ज्यांनी हे अपडेट घेतले आहे असेच यूजर्स हे स्टेटस ऐकू शकणार आहे.व्हॉईस स्टेटससोबतच यूजर 'कलर टूल' आयकॉनवर टॅप करून रेकॉर्डिंगच्या मागे दिसणारा रंग बदलू शकणार आहेत. सध्या तरी स्टेटसमध्ये टेक्स्ट आणि ऑडिओ एकत्र शेअर करण्याचा पर्याय आलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने