दृश्यम, भोला नंतर अजय देवगण - तब्बू पुन्हा एकत्र.. नवीन सिनेमाची घोषणा

मुंबई: अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी सध्या प्रचंड धुमाकूळ घालतेय. तरुण कलाकारांना लाजवेल अशी या दोघांची केमिस्ट्री आहे. दृश्यम पासून तब्बू आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधले प्रत्येक सिनेमे सुपरहिट करत आहेत. दृश्यम नंतर गोलमाल अगेन, दे दे प्यार दे दे, दृश्यम २ आणि आता भोला सिनेमात अजय देवगण आणि तब्बू झळकले. भोला नंतर तब्बू आणि अजय देवगणच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय.नीरज पांडे यांच्या आगामी 'औरो में कहा दम था' या नवीन सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमात तब्बू झळकणार हे निश्चित होतं. पण आता या सिनेमात अजय देवगण झळकणार आहे हे सुद्धा निश्चित झालीय. तब्बू आणि अजय देवगण यानिमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. अजय देवगणने सेटवरचे फोटो शेयर केले आहेत. या फोटोत नीरज पांडे आणि तब्बू दिसत आहेत.नीरज पांडेचे सिनेमे ऍक्शन आणि थ्रिलर म्हणून ओळखले जातात. स्पेशल २६, बेबी, एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी,अ वेनस्डे याशिवाय स्पेशल ऑप्स अशा सिनेमा आणि वेबसिरीजचे दिग्दर्शन नीरज पांडेंनी केलंय.आता 'औरो में कहा दम था' या सिनेमाच्या माध्यमातून नीरज पांडे पहिल्यांदाच रोमँटिक ड्रामा दिग्दर्शित करणार आहे. या सिनेमात अजय देवगण - तब्बूचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय. अभिनेता जिमी शेरगील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.अजय देवगण आणि तब्बू या वयात तरुणांना लाजवेल अशा सळसळत्या उर्जेत काम करत आहेत. दोघांचे वेगळे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय देवगणचा भोला, मैदान असे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तब्बूचा कुत्ते सिनेमा जानेवारीत प्रसिद्ध झाला. याशिवाय भोला आणि खुफिया या सिनेमात तब्बू झळकणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने