अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या IASचा आणखी एक कारनामा; उपमुख्यमंत्रीही संतापले, म्हणाले...

नवी दिल्ली: बिहार सरकारमधील दारूबंदी विभागाचे प्रधान सचिव के. के. पाठक यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये के.के. पाठक आपल्या विभागाची बैठक घेत आहेत. तसेच ते अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत असून बिहारच्या जनतेवरही राग काढताना दिसले होते. त्यातच पाठक यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून यावर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.तेजस्वी यादव यांनी शनिवारी सांगितले की, मी पहिला व्हिडिओ पाहिला आहे. तो सहन करण्याजोगा नाही. त्यात पाठक हे आक्षेपार्ह बोलताना दिसत होते. या व्हिडीओचा वाद थांबला नाही, तोच पाठक यांचा दुसरा व्हिडिओही समोर आला आहे.यावेळी पाठक अधिकाऱ्यांना वगळून इतर आयएएस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत आहेत. पाठक यांचा हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंगदरम्यानचा आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की आई-बहीण काढल्याशिवाय कोणालाही काही समजत नाही.के. के. पाठक सहकारी संस्थेसंदर्भात बैठक घेत होते. त्यात ते म्हणतात, "सर्व सहकारी संस्था काढून टाका. आम्ही प्रत्येक गोष्ट स्वत: वाटप करू. ते पुढं म्हणाले "सब साले सर, सर, सर, सर.. करते रहते हैं, कि सर करेंगे, सर करेंगे, सर करेंगे. साले सभी तो यहां पर सर ही हैं.. बिहार में आम आदमी कौन है? याच बैठकीत त्यांनी एक अधिकाऱ्याला, उल्लू का पट्ठा, इडियट, गधा..." म्हटलं. तसेच सर्वच्या सर्व बिनकामाचे आणि गधे आहेत, असंही ते बोलले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने