संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाला मिळताच ठाकरे पिता पुत्रांचे हटवले फोटो

मुंबई: संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलल्याचं दिसून येत आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब झाल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटो ऐवजी एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले आहेत.याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. संसदेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो शिवसेना संसदीय कार्यालयात लागल्याचे दिसून येत आहे.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने