तुम्हीही पिताय का भेसळयुक्त चहा? या युक्तीने मिनिटांत ओळखा चहापत्तीची शुद्धता

मुंबई: अनेकांच्या सकाळची सुरुवात त्यांच्या चहाने होते. आपल्या देशात टी लव्हर्स मोठ्या प्रमाणात आहे. इथे तुम्हाला चहा पिणारे गल्ली बोळीतल्या लहानशा दुकानांपासून ते 5 स्टार हॉटेल्सपर्यंत सगळीकडे पाहायला मिळतील. पण तुम्हाला माहिती आहे काय की बाजारात खरी आणि भेसळयुक्त दोन्ही प्रकारची चहापत्ती विकली जातेय. दोघांच्या दिसण्यात सुद्धा फारसा फरक नाही. अशा परिस्थितीत लोकही भेसळयुक्त चहा पितात आणि त्यांच्या शरीरावर त्याचा गंभीर परिणाम देखील होतोय.डोकेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक चहालाही औषध मानतात, पण त्यात भेसळ असेल तर ती आरोग्यदायी ठरेल का? त्याचा विचार करता फूड सेफ्टी अँड स्टँडर्स अथॉरीटी ऑफ इंडिया (FSSAI) ने एक युक्ती सांगितली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही चहासाठी वापरलेली चहापत्ती शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे हे सहज ओळखू शकता.

भेसळयुक्त चहापत्ती कशी ओळखायची?

FSSAI नुसार, जर तुम्हाला शुद्ध किंवा भेसळयुक्त चहापत्ती ओळखायची असेल, तर त्यासाठी स्वयंपाकघरात ठेवलेली चहाची पाने घ्या आणि नंतर फिल्टर पेपरवर ठेवा. नंतर त्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि चहाची पाने काढून टाका. आता प्रकाशात फिल्टर पहा.



अशी पटेल मिनिटांत ओळख

जर फिल्टर पेपरवर चहापत्तीच्या पानांची डागं दिसत नसेल तर याचा अर्थ तुमची चहाची पाने शुद्ध आहे. आणि याउलट जर फिल्टर पेपरवर काळे-तपकिरी डाग दिसले तर समजा तुमची चहापत्ती भेसळयुक्त आहे. तुम्ही ही सोपी पद्धत अवलंबून तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या चहाच्या पानांची शुद्धता तपासू शकता.

भेसळयुक्त वस्तूंविरोधात जनजागृती

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरीटी ऑफ इंडिया लोकांमध्ये भेसळयुक्त गोष्टींबद्दल जागरूकता वाढवत आहे. FSSAI असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्या हँडलद्वारे शेअर करत असते, ज्यामध्ये भेसळयुक्त गोष्टी ओळखण्याच्या पद्धती सांगितल्या जातात. या युक्त्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने