'मोदी ग्रेट आहेत, आम्हाला मोदी पाहिजेत'; पाकिस्तानी नागरिक म्हणाले, जर फाळणी...

पाकिस्तान: पाकिस्तानात सध्या आर्थिक मंदी सुरू आहे. तेथील दैनंदिन गरजेच्या असलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या भावाने उच्च पातळी गाठली असल्यामुळे नागरिकांनी एकवेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. पेट्रोलचे दर २५० रूपये प्रतीलीटर, तर भाज्याचे दर १५० च्या पुढे गेले आहेत. त्यामुळे सध्या नागरिकांना हलाखीचे दिवस काढावे लागत आहेत.दरम्यान, केंद्र सरकारकडून लष्कराच्या उपस्थितीत धान्य वाटप केली जात आहे. पण सध्या पाकिस्तानी नागरिकांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो सरकारविरोधात असंतोष व्यक्त करताना दिसत आहे. "आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजेत. मोदी ग्रेट आहेत. जर १९४७ मध्ये फाळणी झाली नसती आणि पाकिस्तान वेगळा झाला नसता तर आज ही वेळ आली नसती, आज महागाई वाढली नसती" असं व्हिडिओमधील तरूण बोलताना दिसत आहे."आम्हाला या देशात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पाहिजेत. आठ वर्षासाठी ते आम्हाला पंतप्रधान म्हणून पाहिजेत. ते जर पंतप्रधान म्हणून लाभले तर ते काही दिवसांत पाकिस्तानची परिस्थिती पूर्वपदावर घेऊन येतील. सध्या भारत आणि पाकिस्तानची कोणत्याच प्रकारची तुलना होत नाही" असंही हा तरूण बोलत आहे.दरम्यान, सध्या पाकिस्तानात महागाईने कळस गाठला असून नागरिक वैतागले असल्याचं चित्र आहे. नागरिकांचा तेथील सरकारविरोधात रोष असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. तर भारत आणि मोदींबद्दल पाकिस्तानी नागरिकांचे चांगले मत असल्याचं चित्र आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने