निर्मला सीतारामन यांची 'पॅन कार्ड'बाबत मोठी घोषणा, आता…

दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत आजा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. आजच्या अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्र्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रासाठी देखील अनेक घोषणा केल्या आहेत.सध्याच्या केंद्र सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी एजन्सींमधील सर्व डिजिटल प्रणालीसाठी समान ओळख म्हणून पॅन कार्ड (Pan Card) वापरण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.या निर्णयामुळे KYC प्रक्रिया सुलभ होईल आणि आयकर विभाग आणि इतर सरकारी संस्थांना पॅन कार्डधारकांची कागदपत्रे मिळवणे सोपे होईल अशी अपेक्षा आहे.लवकरच देशात डेटा गव्हर्नन्स पॉलिसी लागू करण्यात येईल. यामुळे केवायसी प्रोसेस सोपी होणार आहे. नागरिकांना डिजीटल इंडीयासाठी आवश्यक माहिती भरावी लागते त्यासाठी केवायसी प्रोसेस सोपी केली जाणार आहे. नागरिकांचा डेटा डिजीलॉकर सिस्टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.सर्व शासकीय कार्यालयात आता एकमेव ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड वापरता येईल. सध्या एकाच प्रकारची माहिती वेगवेगळ्या स्वरूपात द्यावी लागते, यापासून आता सुटका मिळणार आहे. या प्रोसेस सोपी करण्यासाठी युनिफाइड फायलिंग प्रोसेस हे एकच पोर्टल सरकारकडून सुरू करण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

जगभरात आर्टीफिशीयल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे, दरम्यान देशात एआयच्या विकासाठी आणि देशासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर वाढवण्यासाठी तीन सेंटर उभारले जाणार आहेत. देशातील कृषी, शिक्षण आणि शहरांच्या पुरक विकासाकरिता त्याचा वापर करण्यात येणार आहे. एआयसाठी एक इकोसिस्टीम तयार करण्याची योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली. याचा फायदा आर्टीफिशीयल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात करियर करु इच्छिणाऱ्यांना होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने