'आई की मोठी बहिण?' कियारासोबतच्या ती आहे कोण?

मुंबई:    कियारा आणि सिद्धार्थचं काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये झालेला शाहीविवाह सोहळा अजून चाहते विसरले नाहीत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या फोटोला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लग्नाच्या एका व्हिडिओवर लाखो व्ह्युज आणि हजारो कमेंटसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता कियाराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटस भन्नाट आहे.जैसलमेर मध्ये झालेल्या या लग्नसोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. त्यांच्या रिसेप्शनला तारे तारकांची उपस्थिती ही चर्चेचा विषय होता. इंस्टावरील अभिनेत्रीच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. कियाराचा तिच्या आईसोबतचा फोटो हा प्रतिक्रियांचा विषय ठरतो आहे. कित्येकांनी तर ती कियाराची आई नसून तिची थोरली बहिण आहे. असं समजून तिला प्रतिक्रिया दिली आहे.कियाराच्या लेटेस्ट फोटोमध्ये तिनं पिंक कलरचा ड्रेस परिधान केला आहे. त्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. कियाराचा तो स्टनिंग लूक पाहून चाहते खूश झाले आहेत. त्यात तिनं जिच्यासोबत फोटो काढला आहे त्यामुळे ती चर्चेत आली आहे. कियारानं त्या फोटोमध्ये आपल्या बहिणीला बरोबर घेतले आहे आणि ती देखील तिच्याइतकीच सुंदर आहे. अशा प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.एका नेटकऱ्यानं तर ही कियाराची आई नसून तिची थोरली बहिणच दिसते आहे. अशा शब्दांत त्या फोटोवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. दुसऱ्यानं तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही दोघीही खूप सुंदर दिसता आहात. शेरशाहच्या कपलनं वेडिंग रिसेप्शमधील फोटोशुट देखील सोशल मीडियावर शेयर केले असून त्याला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे.१२ फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थनं आपल्या जवळच्या मित्र परिवारासाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. त्यामध्ये मायलेकींचा फोटो व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांनी केलेल्या कमेंटस लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने