पिझा लवर्ससाठी ५ देसी स्टाइल पिझा रेसिपीज

मुंबई: पिझा भारतीय पदार्थ नसला तरी हा इटालियन पदार्थ भारतीयांनी मनापासून स्वीकारला. लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांनाच पिझा फार आवडतो. त्यामुळे हल्ली बहुतेक घरांमध्ये कोणतीही पार्टी असो किंवा मुलांचा हट्ट महिन्यातून साधारण २-३ वेळा तरी पिझा येतोच. शिवाय काही लोक घरच्या घरी पिझा बनवणंही पसंत करतात. त्यामुळे आता त्याला इंडियन टच आला आहे.

बटर चिकन पिझा

या डिशमधून आपण इटालीयन आणि इंडियन अशा दोन्ही चवींच काँबिनेशन केलं आहे. क्रिमी बटर चिकन, पिझा बेसवर पसरवून ओव्हनमध्ये नीट बेक करून घ्या. जर ओव्हन नसेल तर तव्यावरही बटर टाकून देसी स्टाइलने बेक करता येऊ शकते. बेक करण्याआधी त्यावर कांद्याचे लहान चौकोनी तुकडे, शिमला मिरचीचे तुकडे, ग्रेटेड चीजचा एक थर लावून घ्या आणि छान बेक करा. जर तुमच्याकडे पिझा बेस नसेल तर हे तुम्ही ब्रेडवर पण करू शकता.

चिकन तंदूरी पिझा

या पिझासाठी मसालेदार, स्मोकी आणि काहीसे जळके तंदूरी चिकनचे पिसेस यावर टॉपिंग्ज म्हणून टाकावे. त्याआधी पिझाबेसवर पिझा सॉस लावावा. त्यावर हे चिकन पिसेस टाका. त्यावर पॅरमेसान चीज त्यावर घाला. चीज वितळेपर्यंत बेक करा.मटन खिमा पिझा

नॉनव्हेज प्रेमींसाठी मटन म्हणजे आनंद अशी व्याख्या असते. त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. पिझाबेसवर मसालेदार मटन खिमा टॉपिंग्ज म्हणून वापरू शकतात तर बेसवर करी पसरवून छान बेक करून घ्या. यासाठी आदल्या दिवशीची उरलेली करी यासाठी वापरली तर स्वाद अजून वाढतो.

पनीर मखनी पिझा

पिझामध्ये ही रिच, क्रिमी फ्लेवरची रेसिपी व्हेजिटेरीयन लोकांसाठी नवं आकर्षण आहे. पिझा बेसवर एक्स्ट्रा बटर मनीर मखनीचा लेयर लावा. त्यावर कांदा, शिमला मिरचीचे टॉपिंग्ज लावा. नीट बेक करून घ्या.

ब्रेड पिझा

जर दिवसभरात कधीही पिझा खाण्याची इच्छा झाली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. हा इंस्टंट पिझा आहे. जो ब्रेडच्या दोन स्लाइसने तुम्हाला बनवता येईल. या स्लाइसवर पिझा सॉस पसरवा. त्यावर तुमच्याकडे उपलब्ध गोष्टींचे टॉपिंग्ज पसरवा. चीज घाला आणि तव्यावर नीट शेकून घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने