रांचीच्या सिंघमने वेधले रोहित शेट्टीचे लक्ष; अजय, रणवीरसह अक्षयलाही फोडला घाम

मुंबई: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सध्या आयपीएल 2023 चे वेध लागले आहेत. त्याने हंगामासाठी सराव सुरू केल्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील मध्यंतरी व्हायरल झाले होते. मात्र आता धोनी अचानक अॅक्टिंगकडे वळल्याच आढळून आले आहे. पोलिसी वेशातील धोनीचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. धोनीचा हा अॅक्शन मोडमधील फोटो पाहून सिंघ फेम दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील अश्चर्यचकीत झाला असेल.
महेंद्रसिंह धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याची क्रेझ मात्र कमी झालेली नाही. तो अजूनही आयपीएलच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतोय. त्यामुळे त्याच्याकडील जाहिरातींचा देखील ओघ काही अटलेला नाही. तो विविध ब्रँड्सच्या जाहिराती करत आहे. नुकतेच त्याने एका जाहिरातीचे शुटिंग केले असून त्यात तो पोलिस अधिकाऱ्याच्या रूपात दिसत आहेत. धोनी तसाही भारतीय लष्करात मानद ल्युटेनंट कोलोनेल पदावर आहेच.

धोनीचा पोलिसी वेशातील फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्विटरवर तर चाहत्यांना या फोटोला खूप पसंती दर्शवली. धोनीचा फोटो पाहून सर्वांना रोहित शेट्टीच्या सिंघम, सिंबा चित्रपटाची आठवण झाली. धोनीचा धाकड फोटो पाहून रणवीर सिंह, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम केले आहे. त्या सर्वाना आता महेंद्रसिंह धोनी तगडी टक्कर देतोय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने