शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानी कोट्यवधींची मालकीण, घर पाहून फिरतील डोळे!

मुंबई: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे सध्या प्रकाशझोतात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉक्सऑफिसवर पठाणनं विक्रमी कमाई केली आहे. आता तर पठाणनं सलमान खान, आमिर खान यांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. यासगळ्यात शाहरुखच्या चित्रपटांचे प्लॅनिंग, त्यांचे ब्रँडिंग, प्रमोशन यांचे कामकाज पाहणारी शाहरुखची मॅनेजर चर्चेत आली आहे.पुजा ददलानी असे शाहरुखच्या मॅनेजरचे नाव आहे. बऱ्याच वर्षांपासून ती शाहरुखची मॅनेजर म्हणून काम पाहते आहे. बॉलीवूडच्या किंग खानची मॅनेजर म्हणजे तिला असणारा पगार, तिची लोकप्रियता, तिचे महत्व याविषयी चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. यामुळेच की काय जेव्हा पुजा ददलानीच्या पगाराविषयी चर्चा व्हायरल होते तेव्हा वेगवेगळे प्रश्नही नेटकऱ्यांकडून विचारले जातात.गेल्या वर्षी जेव्हा शाहरुखच्या लाडक्या लेकाचे आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण समोर आले होते तेव्हा त्यात आर्यनला सोडविण्यासाठी पुजाची धडपड सगळ्यांनी पाहिली होती. त्याचवेळी शाहरुखच्या मॅनेजरची चर्चा सोशल मीडियावर रंगण्यास सुरुवात झाली होती. आता तर तिच्या अलिशान घराचे फोटो व्हायरल झाले आहे. ते पाहून नेटकऱ्यांना कमालीचा आनंद झाला आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१२ पासून पुजा ददलानी ही शाहरुखची मॅनेजर म्हणून काम करते आहे. तिच्याकडे शाहरुखचे प्रॉडक्शन हाऊस, रेड चिलीज एंटरटेनमेंट यांची जबाबदारी आहे. मात्र पुजाची गुणवत्ता शाहरुखनं हेरल्यानंतर तिच्याकडे पूर्ण डे शेड्युलची देखील जबाबदारी दिली आहे. शाहरुखचे ब्रँडिंग, त्याचे प्रमोशन, याचे सारे काम ती पाहते. बिझनेसशी संबंधित अनेक गोष्टींची जबाबदारी पूजावर आहे.सध्या पुजा ददलानीच्या घराचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते पाहून नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी ते फोटो पाहिल्यावर तिला तिचा पगारही विचारला आहे. शाहरुखची मॅनेजर आणि उद्योगपती असणाऱ्या पुजाची संपत्ती सहा मिलियन एवढी आहे. २०२० मध्ये तिच्या संपत्तीमध्ये १ मिलियन डॉलरची भर पडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने