'धर्मवीर' नंतर आता प्रसाद ओक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत? विजू मानेंची घोषणा

मुंबई: प्रसाद ओकची भूमिका असलेला धर्मवीर सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमाच्या निमित्ताने प्रसाद ओकने अभिनेता म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.आता प्रसाद ओक त्याच्या कारकिर्दीत आणखी एक महत्वाची भूमिका साकारण्याची चिन्हं दिसत आहेत. हि भूमिका आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची. काल प्रसाद ओकचा वाढदिवस झाला त्यानिमित्ताने विजू माने यांनी हि घोषणा केली.विजू माने यांनी प्रसाद ओक सोबतचा फोटो पोस्ट केलाय. या फोटोत प्रसाद ओकच्या हातात असलेल्या सीडी कव्हरवर वीर सावरकरांचा फोटो आहे. या फोटोखाली विजू माने यांनी लिहिलंय कि.. तुझ्या हातात असलेल्या सीडी कव्हर वर जो फोटो आहे तो रोल तू करणार.आणि तो सिनेमा मी दिग्दर्शित करणार हे विधीलिखित लवकरच प्रत्यक्षात येवो ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.( त्याआधी एक जोरदार मॅच प्रॅक्टिस होईलच). अशी पोस्ट करून विजू माने यांनी प्रसाद ओकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेतत्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारल्यानंतर प्रसाद ओक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

दरम्यान विजू माने यांनी अशी घोषणा करताच नेटकऱ्यांनी प्रसाद ओकला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत पाहायला आवडेल, अशा सकारात्मक कमेंट केल्या आहेत. त्यामुळे प्रसाद ओक त्याच्या दमदार अभिनयाने वीर सावरकरांची भूमिका गाजवणार, यात शंका नाही२०२२ झालेल्या सुपरहिट झालेल्या धर्मवीर सिनेमाचा पुढचा भाग म्हणजेच धर्मवीर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद ओक पुन्हा एकदा धर्मवीर २ मधून आनंद दिघेंची भूमिका साकारणार आहे.धर्मवीर सिनेमात प्रसाद ओकने साकारलेल्या आनंद दिघेंच्या भूमिकेमुळे त्याला कमालीची लोकप्रियता मिळाली आणि त्याच्यावर पुरस्करांचा वर्षाव झाला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने