पाकिस्तानात महागाईचा उच्चांक! पेट्रोल अन् रॉकेलचे दर पाहाल तर बसेल झटका

इस्लामाबाद : पाकिस्तानात सध्या महागाईनं उच्चांक गाठला असून अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळं खाद्य पदार्थांच्या वस्तूंसह इंधनाच्या किंमतींनीही उच्चांक काठला आहे. त्यानुसार पाकिस्तानातील इंधनाचे दर आज १२ टक्क्यांनी वाढले आहेत.पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारपुढं आर्थिक संकटाचं मोठं आव्हान असून महागाई नियंत्रणात आणणं त्यांना अशक्य बनलं आहे. इंधनाचे दर प्रचंड वाढल्यानं त्याचे परिणाम इतर सर्व प्रकारची महागाई वाढण्यावर झाले आहेत.इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात IMF कडून फंड मिळवण्याच्या नादात पकिस्तान सरकारनं पेट्रोल आणि गॅसच्या दरात ऐतिहासिक वाढ केली आहे. पाकिस्तान सरकारनं पेट्रोलचे दर २२.२० रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळं पाकिस्तानात पेट्रोलची किंमत २७२ रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे.तर हायस्पीड डिझेलच्या किंमतीत १७.२० रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर हायस्पीड डिझेलची किंमत २८० रुपये प्रति लिटर झाली आहे. त्याचबरोबर केरोसिनच्या दरात १२.९० रुपयांनी वाढ केल्यानं त्याची किंमत २०२.७२ रुपये झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने