T20 वर्ल्ड कप जिंकलेली ऑस्ट्रेलिया टीम मालामाल; तर टीम इंडियादेखील कोट्याधीश

मुंबई: ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा महिला T20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. रविवार 26 फेब्रुवारीला मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन टीमने फायनलमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेला 19 धावांनी पराभूत केलं.ऑस्ट्रेलियाने महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची ही सहावी वेळ आहे. चॅम्पियनशिपसोबत ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची हॅट्रिक केली. विजयानंतर ऑस्ट्रेलियाला टीम मालामाल झाली आहे. विजेतेपदाच्या ट्रॉफीसह घसघशीत बक्षीस रक्कमही मिळाली आहे. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आधीच महिला टी 20 वर्ल्ड कप 2023 साठी प्राइज मनीची घोषणा केली होती. या टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेल्या सर्व 10 टीम्समध्ये एकूण 2.45 मिलियन डॉलर म्हणजे 20.31 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे वाटप करण्यात आलं.चॅम्पियनला टीम ऑस्ट्रेलियाला 1 मिलियन डॉलर म्हणजे 8.29 कोटी रुपये इनामी रक्कमेपोटी मिळाले. फायनलमध्ये हरलेल्या दक्षिण आफ्रिकेला 5 लाख डॉलर म्हणजे 4.14 कोटी रुपये मिळाले.इतकंच नव्हे तर ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक मॅच जिंकणाऱ्या टीमला 17,500 डॉलर म्हणजे 14.51 लाख रुपये देण्यात आले. ऑस्ट्रेलियाने ग्रुप स्टेजमधील चारही सामने जिंकले.यासाठी त्यांना 1 मिलियन डॉलरशिवाय 70 हजार डॉलर म्हणजे 58 लाख रुपये इनामी रक्कमेपोटी मिळाले. म्हणजेच त्यांना एकूण 8.87 कोटी रुपये मिळाले.

तर टीम इंडियादेखील कोट्याधीश

उपांत्य फेरीतील पराभवासाठी भारत आणि इंग्लंड दोन्ही टीम्सना एकसमान 1.74 कोटी रुपये मिळतील.भारताने ग्रुप स्टेजमध्ये 3 सामने जिंकले होते. यामुळे भारताला 43 लाख रुपये मिळतील. भारताच्या खात्यात इनामी रक्कमेपोटी एकूण 2.17 कोटी रुपये जमा होतील.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने