राजिनामा दिलेल्या आर.आर.आबांना भेटायला विलासराव देशमुख गेले अन् चकीतच झाले!

मुंबई:  राज्याचं एक असं नेतृत्व ज्यांच्याकडे पाहुन साधेपणा तो याहुन वेगळा काय? असा विचार येतो. ते नेतृत्व म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय आर.आर.पाटील होय. स्वच्छ, नितळ व्यक्तिमत्व म्हणून आबांची ओळख आहे.आबांच्या साधेपणाचे अनेक किस्से आहेत. त्यांनी कधीही पदाचा, लाल दिव्याचा गर्व केला नाही. साधेपणा नेहमीच त्यांचा प्लस पॉईंट राहिला आहे. आज आबांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानेच त्यांचा आणि विलासराव देशमुखांचा एक किस्सा पाहुयात.

आबा मुळचे सांगलीच्या तासगाव तालुक्यातील अंजनी या गावचे. त्यांचे बालपण प्राथमिक शिक्षण सर्वकाही तिथेच झाले. शालेय जीवनपासूनच आबांच्यात नेतृत्व गुण होते. शांतीनिकेतन संस्थेत शिकत असताना विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजनेतील रोजगार वाढवून मिळावा, यासाठी त्यांनी शिष्टमंडळ घेऊन संस्थेचे अध्यक्ष पी. बी. पाटील यांची भेट घेतली होती.राजकीय जीवनाची सुरुवात त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून केली.१९७९ ते १९९० अशी ११ वर्षे ते सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९९० साली ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. एकंदर सहा वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. त्यांच्यावर पक्षाने जी जबाबदारी सोपवली त्यावर आबांनी ठसा उमटवला.आपण मोठ्या पदावर असताना एखादी शुल्लक गोष्टही तूमच्यासाठी घातक ठरू शकते. असेच काहीसे आबांच्या बाबतीत झाले. आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यानी 26/11 चा भीषण हल्ला केला. तेव्हा आबांनी मराठीत व्यवस्थित प्रतिक्रिया दिली. पण हिंदीमध्ये प्रतिक्रिया देताना थोडी गडबड झाली. हिंदीतील त्यांच्या बाईटचा चुकीचा अर्थ लावून त्यांची मीडिया ट्रायल घेतली. आबा सारख्या साध्या माणसाला ते सहन झाले नाही. त्यांनी राजीनामा दिलाराज्याच्या या उपमुख्यमंत्र्यांने आपला पसारा भरून गावाची वाट धरली. एखाद्या मोठ्या पदावरून पायउतार झालेला नेता. नाराज होऊन बसेल. गेलेली प्रतिष्ठा पुन्हा कशी मिळवायची याचा विचार करेल. पण, आबा तसे नव्हते. जस एक नोकरी सुटल्यावर लोक दुसऱ्या नोकरीचा विचार करतात. काहीच मिळत नाही तोवर लोक शेतात राबायला जातात. अगदी तसंच या माजी मुख्यमंत्र्याने केले.  

तेव्हा आबांना भेटायला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आबांच्या गावी गेले. तेव्हा आबा शेतात होते. विलासरावांना वाटलं की आबा बांधावरून फेरफटका मारायला गेले असतील. पण, कशाचं काय. तिथ घोटाभर चिखलाने माखलेले हातात फावडे व उसाला पाणी देत होते. हे पाहून विलासराव देशमुख यांना धक्का बसला. काल पर्यंत उपमुख्यमंत्री असणारा माणूस सर्व रुबाब प्रतिष्ठा विसरून शेतात सामान्य शेतकऱ्याप्रमाणे राबत होता.आबा शेवटपर्यंत राजकारणात सक्रीय होते. त्यांना तंबाखू खाण्याचे व्यसन होते. त्या व्यसनामुळेच त्यांना कॅंसर झाला होता. या आजारातच त्यांची प्राणज्योत मालवली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने