"सुनो काँग्रेसवालों..."; रामदास आठवलेंची एक कमेंट अन् सभागृहात पिकला हशा

दिल्ली: मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पाकडे देशाचं लक्ष लागलेलं होतं. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंमुळे चांगलीच रंगत आली. त्यांच्या एका कमेंटमुळे सभागृहातलं वातावरण हलकंफुलकं झालं.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प वाचत होत्या. त्यावेळी वाचता वाचता त्या मध्येच थांबल्या. त्यावेळी त्यांच्या मागेच बसलेल्या आठवले यांनी 'सुनो काँग्रेसवालों' अशी कमेंट केली. अन् सभागृहामध्ये चांगलाच हशा पिकला.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडत होत्या. यावेळी बोलता बोलता Old Polluting Vehiclesअसं म्हणण्याऐवजी चुकून त्या Old Political...असं म्हणाल्या, अन् पुन्हा एकदा सगळ्यांना हसू अनावर झालं. पुन्हा सीतारामन यांनी दिलगिरी व्यक्त करत दुरुस्ती केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने