Rocky Aur Rani Ki Prem Kahani ची पुन्हा बदलली रिलीज डेट..आता 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलीवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत पहायला मिळतो. कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे त्याच्या बातम्या कानावर पडत असतात.सध्या करण जोहर अनेक वर्षांनी दिग्दर्शक म्हणून लाइमलाइटमध्ये यायला उत्सुक आहे. खूप वर्षानंतर करण जोहर 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून कमबॅक करत आहे.करण जोहरनं नुकतंच आलिया भट्ट आणि रणवीर सिंग अभिनित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या रिलीज डेटमध्ये बदल केल्याचं सूचित केलं आहे. असं केल्यामुळे आता चर्चा सुरू झालीय ती त्यानं सिनेमाची रिलीज डेट तिसऱ्यांदा का आणि कोणासाठी बदलली याची?'रॉकी और रानी क प्रेम कहानी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बातमी होती की हा सिनेमा २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात रिलीज होत आहे. पण त्यानंतर करण जोहरनं या सिनेमाची रिलीज डेट पुन्हा बदलली.करणनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर केली होती..आणि लिहिलं होतं की,''सात वर्षानंतर एक दिग्दर्शक म्हणून माझ्या हक्काच्या घरात म्हणजे सिनेमागृहात परतण्याची वेळ आता जवळ आली आहे. 

माझ्या ७ व्या सिनेमाच्या सेटवर एक नाही तर कितीतरी दर्जेदार कलाकारांसोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं. या सिनेमाची कहाणी परंपरांना जोडणारी आहे..या सिनेमाचं संगीत तुमच्या मनाला स्पर्श करेल..आता वाट पाहणं संपलं...रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा पुढील वर्षी २८ एप्रिल २०२३ रोजी रिलीज होत आहे''. अशी पोस्ट करणनं केली होती.पण आता पुन्हा प्रेक्षकांच्या पदरी वाट पाहणं असणार हे नव्या बातमीमुळे कळत आहे..कारण सिनेमाची रिलीज डेट पुन्हा बदलण्यात आली आहे.'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा आता २८ जुलै २०२३ रोजी सिनेमागृहात रिलीज केला जाणार आहे. यासंदर्भातील पोस्ट आलियानं आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केली आहे. आता पुन्हा रिलीज डेट का बदलली याचं कारण मात्र समोर आलेलं नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने