प्राण्यांना आधीच भूकंपाची चाहुल लागते का? काय सांगतं संशोधन...

तूर्की: भूकंप ही एक अशी समस्या आहे, जी अचानक उद्भवते. याचा आधीच अंदाज बांधणे कठीण असते. भूकंपापासून वाचण्यासाठी अनेक उपाय योजना करता येऊ शकतात पण भूकंप कधी आणि कुठे येणार हे सांगता येऊ शकत नाही. म्हणूनच जपान सारख्या विकसित देशातही त्यांना घरं अशा बनवावी लागतात की, भूकंप आल्याने नुकसान झाले तरी घरं परत बनवता येतील. तिथेही भूकंप कधी येईल याचा अंदाज बांधता येत नाही.पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, ज्या गोष्टीचा शोध अजून माणसाला लावता आलेली नाही ते प्राण्यांना सहज ओळखता येतं. जनावरांना भूकंप येण्याआधीच त्याची जाणीव होते आणि त्यांच्यात अस्वस्थता वाढते. ही गोष्टी संशोधनातून सिद्ध झाली आहे. काय सांगतं संशोधन जाणून घेऊया.

या गोष्टीचा शोध लावण्यासाठी मॅक्स प्लँक इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅनिमल बिहेवियरने एक संशोधन केलं आहे. संशोधना दरम्यान जनावरांना अशा जागी सोडण्यात आलं जिथे सर्वाधिक भूकंप होतात. या जनावरांच्या शरीरावर एक्सीलरोमीटर लावण्यात ले. बरेच महिने या प्राण्याच्या वागणूकीवर लक्ष ठेवण्यात आलं. याकाळात तिथे साधारण १८००० भूकंप आले. पण त्यापैकी १२ भूकंप असे होते ज्याची तीव्रता ४ रिक्टर स्केलपेक्षा जास्त होती. संशोधनात समोर आलं की, भूकंपाच्या काही तास आधी जनावरांमध्ये एक अस्वस्थता दिसून येते.या जनावरांच्या हालचाली २८ किलोमीटरच्या दरम्यान फार वेगात होत्या. भूकंप येण्याआधी जनावरं आपल्या राहण्याची ठिकाणं सोडतात, पक्षी झाडावरून उडून जातात आणि पाळीव प्राणी आपल्या गोठा, तबेला, घर यातून बाहेर पडताता. त्यांच्या हालचाली असामान्य असतात.संशोधन काय सांगतं?

भूकंप येण्याआदी दगडांवर पडणाऱ्या दबावाने जे आयोडाइजेशन तयार होतं ते प्राणी आपल्या त्वचेमुळे आणि फरमुळे ओळखतात. शिवाय भूकंपाआधी क्वार्टज क्रिस्टलमधून निघणारा गॅसचा वासपण काही जनावर घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना आधीच समजतं की, काहीतरी अघटीत घडणार आहे. त्यामुळे ते अस्वस्थ होतात. पण जनावरांच्या कोणत्या हालचालीचा काय अर्थ काढावा, किती तास आधीची ही धोक्याची घंटा समजावी यासंदर्भात अजून संशोधन होणं आवश्यक आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

भूकंप येण्याआधी जमीनीच्या आत हालचाल होत असते. ते सामान्य माणूस समजू शकत नाही. पण जनावरांची ऐकण्याची क्षमता आणि जाणिवा जास्त सूक्ष्म असतात. त्यांना ती हालचाल आणि कंपनं आधीच जाणवतात. ते आपल्या भावना व्यक्त करू शकत नसल्याने त्यांच्या स्वभावात बदल होतो. ते अस्वस्थ होतात आणि इकडे-तिकडे पळू लागतात, असामान्य वर्तन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने