हिंडेनबर्गचा सर्जिकल स्ट्राइक सुरुच! अदानी समुहाला पुन्हा मोठा धक्का

अमेरिका: अमेरिकन संशोधन संस्था हिंडेनबर्गच्या अहवालाचे धक्के आजही अदानी समूहाला बसत आहेत. आजही अदानी समूहाचे ४ शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत तर गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत २२ व्या क्रमांकावर गेले आहेत. अदानी यांची वेगात झालेली प्रगती हिंडेनबर्गमुळे वेगात खाली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुरू असलेल्या घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीतही त्याच दराने घट होत आहे. याचा परिणाम जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत दिसून येत आहे. 

जिथे २०२३ च्या सुरुवातीला गौतम अदानी टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या स्थानावर दबदबा निर्माण करत होते, तिथे आता काही दिवसातच त्यांची या यादीत २२ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.फोर्बच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार आज गौतम अदानींची नेट वर्थ ५८.४ बिलियन डॉलर झाली आहे. अदानी यांच्या कमाईत देखील मोठी घट होत आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये कमाईच्या बाबतीत त्यांनी जगातील सर्व श्रीमंत लोकांना मागे टाकले होते. २०२२ मध्ये त्यांनी एका वर्षात जेवढे कमावले होते त्यापेक्षा जास्त त्यांनी १३ दिवसांत गमावले आहे. अदानींच्या कंपन्यांच्या समभागांच्या सततच्या घसरणीमुळे आता अदानी समूहाचे मार्केट कॅप निम्म्यावर आले आहे.अदानी समूहाला विचारले ८८ प्रश्न?

हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालात अदानी समूहाला ८८ प्रश्न विचारले आहेत. या अहवालात अदानी समूहाला विचारण्यात आले आहे की, गौतम अदानी यांचे धाकटे बंधू राजेश अदानी यांना समूहाचे एमडी का करण्यात आले आहे, तर त्यांच्यावर कस्टम करचोरी, बनावट आयात दस्तऐवज आणि अवैध कोळसा आयात केल्याचा आरोप आहे.हिरे व्यापार घोटाळ्यात नाव आल्यानंतरही गौतम अदानी यांचे मेहुणे समिरो व्होरा यांना अदानी ऑस्ट्रेलिया विभागाचे कार्यकारी संचालक का करण्यात आले, असे अनेक प्रश्न हिंडनबर्ग रिसर्च एजन्सीने अदानी समूहाला विचारले आहेत.

हिंडेनबर्ग रिसर्चचा इतिहास :

हिंडेनबर्ग रिसर्चची स्थापना २०१७ मध्ये नॅथन अँडरसन यांनी केली होती. हिंडेनबर्गने आतापर्यंत अनेक कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. ६ मे १९३७ रोजी झालेल्या हायप्रोफाइल हिंडेनबर्ग एअरशिप क्रॅशवरून कंपनीला नाव देण्यात आले आहे.अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मँचेस्टर टाऊनशिपमध्ये हा अपघात झाला होता. हिंडेनबर्ग रिसर्च कोणत्याही कंपनीत होणारे घोटाळे शोधून काढते आणि नंतर त्याबद्दलचा अहवाल प्रकाशित करते. ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था आहे जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने