समालोचक दिनेश कार्तिकची भविष्यवाणी ठरली खरी; मार्क वॉ हरला DK जिंकला!

मुंबई:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने कांगारूंचा 1 डाव आणि 132 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच दिवशी 177 धावात गुंडाळले. त्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात तब्बल 400 धावांचा डोंगर उभारला.पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 91 धावात संपवत सामना एक डाव आणि 132 धावांनी खिशात टाकला. भारताने अडीच दिवस चाललेल्या सामन्यात फक्त एकदाच फलंदाजी केली.दिनेश कार्तिक भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत विकेट्स मागे नाही तर माईकच्या मागे होता. त्याने पहिल्याच दिवशी एक मोठी आणि बोल्ड भविष्यवाणी केली होती. त्याने मार्क वॉ बरोबर झालेल्या शाब्दिक द्वंद्वावेळी भारत या सामन्यात फक्त एकदाच फलंदाजी करेल असे सांगितले होते. यानंतर मार्क वॉ चांगलाच लाल झाला होता.






भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या कांगारूंचा पहिला डाव 177 धावात संपवला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 223 धावांची भक्कम आघाडी घेतली. यानंतर कांगारूंनचा दुसरा डाव 91 धावात संपवत दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची तसदी घेतली नाही. विशेष म्हणजे पहिल्या डावात कांगारूंनी 64 षटके तर धरला तर दुसऱ्या डावात षटकेच खेळू शकले.भारताकडून दुसऱ्या डावात अश्विनने 5 विकेट्स घेतल्या तर रविंद्र जडेजाने त्याला विकेट्स घेत चांगली साथ दिली. फलंदाजीत बोलायचे झाले तर रोहित शर्माने सर्वाधिक 120 धावा तर अक्षर पटेलने 84 आणि रविंद्र जडेजाने 70 धावांचे योगदान दिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने