पायाला सूज पण काळजात रग; अपघातानंतर ऋषभचं एक पाऊलं पुढे

मुंबई:   भारतीय विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतचे नवे फोटो समोर आले आहेत. कार अपघाताला सामोरे गेल्यानंतर पंत सावरण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंत आता घरी आराम करत असून, पायावरील शस्त्रक्रियेनंतर आता पंतला मैदानात परतण्याचे वेध लागले असून, त्या दृष्टीने तो प्रयत्न करताना दिसून येत आहे. पंतचा एक फोटो समोर आला असून त्यात तो चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.पंतच्या इन्स्टा फोटोमध्ये पंतच्या उजव्या पायाला अजूनही सुजलेला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पण तरीही तो यातून एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.हा फोटो शेअर करताना पंतने कॅप्शन दिले आहे की, एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत, एक पाऊल चांगले असे म्हटले आहे. पंतच्याया सरावामुळे तो लवकरच मैदानात परतेल अशी अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने