"पवार साहेब देशातल्या काही आघाडीच्या उद्योगपतींच्या संपर्कात"; नव्या पोस्टची चर्चा

मुंबई:   रोहित पवार यांच्या फेसबुक पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे. यामध्ये रोहित पवार यांनी शरद पवार काही उद्योगपतींच्या संपर्कात असल्याचा उल्लेख केला आहे. तसंच काही उद्योगपतींसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. काय आहे की पोस्ट?आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, " माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीमध्ये उद्योग आणण्यासाठी ‘जिंदाल स्टील’चे CMD सज्जन जिंदाल जी, पॅकेजिंग उद्योगातील आघाडीच्या TPCL कंपनीचे मालक व MD साकेत कनोरीया जी तसंच मित्रासोबत एशियन पेंट्स कंपनी सुरू करणारे आणि आता विविध व्यवसायात असलेले अमित चोक्सी जी यांना भेटून चर्चा केली".


रोहित पवार पुढे म्हणाले, "आदरणीय शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब हेही यावेळी उपस्थित होते. आदरणीय पवार साहेबांचे याबाबत व्यक्तीशः लक्ष असून कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी तेही देशातील इतर काही आघाडीच्या उद्योगपतींच्या संपर्कात आहेत."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने