'तू तर राखी सावंत दिसतेयस..', सुजलेल्या चेहऱ्याच्या रुबिनाला पाहून यूजर्सच्या भन्नाट कमेंट्स

मुंबई:  टी.व्ही अभिनेत्री आणि बिग बॉस १४ ची विजेती रुबिना दिलैकनं नुकताच आपला एक फोटो शेअर केला आहे..जो पाहिल्यावर सगळ्यांनाच थोडा धक्का बसला आहे. या फोटोत रुबिनाच्या चेहऱ्याचा पूर्ण नक्षाच बदलल्याचं दिसत आहे.तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते मात्र चिंतेत पडले आहेत. काहींनी म्हटलंय की,'तू एक्स्पायर मेकअप चेहऱ्याला लावला होतास का?',तर काहींनी रुबिना दिलैकला 'लवकर बरी हो' म्हणत काळजी व्यक्त केली आहे.खरंतर रुबिना दिलैकची तब्येत सध्या बिघडली आहे ती आजारी आहे आणि म्हणून त्यामुळे तिच्या चेहऱ्याला सूज आली आहे. हेच कारण आहे की रुबीना दिलैकचे चाहते तिची चिंता करु लागलेयत.

रुबिना दिलैकनं इन्स्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. तिनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलं आहे की,तिला ताप आलाय, घसाही दुखतोय म्हणजे इन्फेक्शनमुळे. असं तिनं म्हटलंय.आणि सोबत ओठांना चांगलीच सूज आलीय त्यामुळे आपलं तोंड एखाद्या बदकासारखं दिसत आहे असं तिनं लिहिलं आहे. या आजारपणामुळे आपण खूप कंटाळलोय,त्रस्त आहोत आणि सर्वात म्हत्त्वाचं म्हणजे चेहऱ्याला सूज आल्यानं इरिटेट देखील झालो आहोत.स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहून मलाच हसू येतंय हे सांगायाला देखील रुबिना विसरली नाही बरं का.फोटोमध्ये रुबिना दिलैकचे ओठ सुजलेले दिसत आहेत. तिनं म्हटलंय, ''कोणत्याही फिलर किंवा सर्जरी शिवाय माझे ओठ बदकासारखे झालेयत''. रुबीनाचे डोळे देखील फोटोत सुजलेले दिसत आहेत आणि ती खूप कमकुवत दिसत आहे.रुबिना दिलैकचे फोटो पाहून आता तिचे चाहते मात्र चिंतेत सापडलेयत. काहीजण तर तिची मस्करी करताना दिसत आहेत.एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की-'वाटतं मॅडमनी एक्स्पायर मेकअप चेहऱ्याला लावला म्हणून हे असं झालं'. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'असं काय खाल्लंस म्हणून चेहऱ्याचं हे असं झालं?', एकानं तर चक्क लिहिलं आहे की,' तू तर राखी सावंतसारखी दिसतेस'.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने